शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक चित्रपटांचा ठेवा पुण्यात

By admin | Updated: March 22, 2017 03:27 IST

भारतीय चित्रपटांचे जतन व संवर्धन करण्याचे आगार मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात अभिजात, ख्यातनाम जागतिक चित्रपटांची भर

पुणे : भारतीय चित्रपटांचे जतन व संवर्धन करण्याचे आगार मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात अभिजात, ख्यातनाम जागतिक चित्रपटांची भर पडली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलसह अ‍ॅकॅडमी विजेते, गोल्डन ग्लोब्स अ‍ॅवॉर्ड, द ब्रिटिश अ‍ॅकॅडमी फिल्म अ‍ॅवॉर्ड आणि रॉबर्ट अ‍ॅवॉर्ड प्राप्त विजेत्या चित्रपटांच्या संपादनामुळे संस्थेची राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय चित्रपट संग्रहालय अशी नवीन ओळख निर्माण होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. एनएफएआय विविध देशांच्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करून त्या त्या देशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि राजदूतांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावर भर देत आहे. त्याच्याच परिणामस्वरूप गाजलेल्या परदेशी चित्रपटांचा हा अमूल्य ठेवा संग्रहालयाला उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. संस्थेच्या अभिजात चित्रपटांच्या खजिन्यात फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, बोस्निया, हर्जेगोविना आणि इराण आदी देशांचे चित्रपट समाविष्ट झाले आहेत. लेमिंग २००५, इन्व्हेशन्स बार्बर्स २००३ आणि द बिट दॅट माय हार्ट स्किप २००५ (फ्रान्स), इन्फंट २००५ (बेल्जियम), काँगकाबले २००४ (डेन्मार्क), गोरी वाट्रा (हर्जेगोविना) या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश आहे. मुंबईतील इराणी दूतावासाकडून इराणी चित्रपटही संस्थेने संपादित केले आहेत. प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक मोहसेन मखमलबफ्सचा गाजलेला चित्रपट द पेडलर (१९८९), द अफगाण अल्फाबेट २००२ लघुपट तसेच पुरान दरखशानदेहचा ‘वेट ड्रीम (२००५) आणि शहराम असिद्दी यांचा ‘अविनार’ (१९९१) हे चित्रपट संस्थेला मिळाले आहेत. (प्रतिनिधी)