सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या कराटे शिक्षकास दहा वर्षाची कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 09:03 PM2023-03-03T21:03:58+5:302023-03-03T21:04:10+5:30

आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.साळुंखे न्यायालयाने दहा वर्ष कैद व १७ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली

Karate teacher who molested sixteen-year-old girl jailed for 10 years | सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या कराटे शिक्षकास दहा वर्षाची कैद

सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या कराटे शिक्षकास दहा वर्षाची कैद

googlenewsNext

पुणे : सहा वर्षांपूर्वी पुण्यातील काेंढवा परिसरात कराटे क्लासेस घेणाऱ्या एका शिक्षकाने दहावीत शिकत असलेल्या मुलीस घरी बाेलावून तिच्यावर बलात्कार करुन गर्भवती केल्याप्रकरणी अाराेपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.साळुंखे न्यायालयाने दहा वर्ष कैद व १७ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

असिफ रफिक नदाफ (वय ३१,रा.काेंढवा,पुणे) शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आराेपीवर २०१८ मध्ये काेंढवा पाेलीस ठाण्यात बलात्कार व पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्या आला हाेता. आता पीडिता ही 21 वर्षांची आहे. ही घटना अाॅगस्ट २०१६ ते जानेवारी २०१७ यादरम्यान घडली. तेव्हा पीडिता ही 16 वर्षांची होती. संबंधित पीडित मुलगी ही काेंढवा येथे अाराेपीच्या कराटे क्लास मध्ये कराटे शिकण्यास जात हाेती. त्यावेळी अाराेपी असिफ नदाफ याने तिला ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम अाहे’ असे सांगून तिला घरी काेणीही नसताना घेऊन गेला. त्यानंतर तिच्या अाईवडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन वेळाेवेळी अल्पवयीन मुलीस घरी बाेलवून घेत तिच्यासाेबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत हाेता. यामुळे संबंधित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर याबाबतचा प्रकार पीडित मुलीच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांनी अाराेपी विराेधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली. यादरम्यान तिला बाळ ही झाले.

याप्रकरणात डीएनए रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र मुलीची साक्ष, सर्व घटनाक्रम, मुलींचा पाेलिसांसमाेरील जबाब, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समाेरील कलम १६४ चा जबाब व न्यायालयातील जबाब सुसंगत हाेता. घटनेच्या वेळी मुलगी अल्पवयीन असल्याने तिची तथाकथित संमती ग्राहय धरता येणार नाही आदी मुद्दे न्यायालयाने लक्षात घेऊन आरोपीस शिक्षा सुनावली.

Web Title: Karate teacher who molested sixteen-year-old girl jailed for 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.