Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 01:55 PM2024-06-17T13:55:26+5:302024-06-17T14:06:26+5:30

प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं, आपल्या हक्काचं घर असावं. कारण आपल्या स्वत:च्या घरात राहण्याचं सुख काही औरच असतं. परंतु घरांच्या किंमती इतक्या जास्त असतात की एकसाथ ही रक्कम जमा करणं कुणालाही सहज शक्य होत नाही.

बहुतांश लोक आपल्या हक्काचं घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. एवढी मोठी रक्कम एकत्र देण्याऐवजी EMI च्या माध्यमातून बँकेकडून गृहकर्ज घेतले जाते. गृहकर्जावरील EMI च्या सुविधेमुळे कुठल्याही व्यक्तीवर आर्थिक भार एकदम पडत नाही.

मात्र EMI ची रक्कम आणि त्यावरील व्याज हे डोकेदुखी ठरते. लवकरात लवकर गृहकर्जातून मुक्त कसं होऊ यासाठी मार्ग शोधत असतात. काही मार्ग नक्कीच आहेत ज्यामुळे EMI च्या रक्कमेसोबतच गृहकर्जावरील कालावधी कमी केला जाऊ शकतो.

टप्प्याटप्प्याने भरपाई केल्यानं EMI च्या प्रिसिंपल अमाऊंटसोबत त्यावरील लागणारे व्याजही कमी होऊ शकते. एडवान्स रक्कमेमुळे कर्ज भरण्याचा कालावधीही तोदेखील कमी होऊ शकतो. त्याशिवाय EMI बाऊन्स आणि त्यावर लागणाऱ्या शुल्कापासूनही वाचता येते. एकूणच काय प्रीपेमेंटमुळे अनेक प्रकाराच्या त्रासातून वाचता येते.

EMI अंतर्गत तुम्ही एखादी फिक्स रक्कम ठराविक कालावाधीसाठी वेळच्यावेळी बँकेत जमा करता. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर फिक्स रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेची भरपाई केली जाऊ शकते. अधिकचे पैसे दिल्यामुळे तुमच्यावरील कर्जाचं ओझं कमी होऊ शकते.

मात्र तुम्ही हे त्यावेळी करू शकता जेव्हा तुमचं उत्पन्न पहिल्यापेक्षा अधिक झालं असेल किंवा तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशातून मॅच्युरिटीनंतर पैसे मिळतील. त्या पैशांचा वापर EMI भरणा करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

जर तुमचं उत्पन्न ठीकठाक असेल, आर्थिक स्थिती सुधारली असेल तर EMI मध्ये अधिकच्या रक्कमेची भरपाई तुम्ही करू शकता, हा एक पर्याय तुमच्याकडे आहे. त्यातून २ फायदे तुम्हाला होतील. एकतर तुमच्या कर्जावरील व्याज कमी होईल आणि हफ्ता भरण्याचा कालावधीही कमी होईल.

कर्जाची भरपाई करण्याबाबतचे अनेक पर्याय चांगल्याप्रकारे समजून घ्या, त्यानंतर आपल्याला सोयीस्कर होईल अशाप्रकारे पर्याय निवडा. अधिकच्या रक्कमेतून तुम्ही गृहकर्जावरील मुद्दल कमी कमी करत कर्जातून लवकरात लवकर मुक्त होऊ शकता.

जर कुठल्या अन्य मार्गातून मोठी रक्कम तुमच्या हातात लागत असेल तर त्याचा वापर कर्जाचे पैसे फेडण्यासाठी केला जाऊ शकतो. हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्ज लवकरात लवकर संपेल.