शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

लागी करजवा कट्यार..!

By admin | Updated: March 5, 2015 00:33 IST

‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर बोलायला लागले, तर एक पुस्तक होईल, असे सांगताच फय्याज यांना ‘कट्यार’मधील गाणं म्हणण्याचा रसिकांनी आग्रह केला

पुणे : ‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकावर बोलायला लागले, तर एक पुस्तक होईल, असे सांगताच फय्याज यांना ‘कट्यार’मधील गाणं म्हणण्याचा रसिकांनी आग्रह केला आणि त्यांनी ‘लागी करजवा कट्यार’ आणि ‘वो जो हम मे तुम मे करार था’ अशी दोन पदे त्याच बाजात आणि ठसठशीत आवाजात सादर करून सर्व माहोलच बदलून टाकला. त्याला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून मानवंदना दिल्याने त्या गहिवरल्या. संध्या देवरुखकर संपादित गायक वसंत देशपांडे यांच्यावर आधारित ‘वसंत-बहार’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फय्याज यांच्या झाले. या वेळी त्या बोलत होत्या. संगीत समीक्षक अशोक रानडे, विजय देशपांडे व सु. वा. जोशी या वेळी उपस्थित होते. ‘कट्यार काळजात घुसली’च्या निमित्ताने तब्बल १६ वर्षे मला बापूंचा सहवास लाभला. ‘कट्यार’चे तब्बल ५३५ प्रयोग झाले. त्यांचे अभूतपूर्व तालमी, अवर्णनीय दौरे होते. या सर्व प्रयोगांमध्ये तब्बल ५३५ वेळा वेगवेगळे बापू आणि त्यांचे गाणे अनुभवले. आमच्यात मुलगी-वडिलांचे नाते होते, असे सांगत गहिवरल्या आवाजात असंख्य आठवणींचा कोलाज फय्याज यांनी उलगडला. (प्रतिनिधी)४फय्याज म्हणाल्या, ‘‘बापूंमध्ये चंद्राची शीतलता आणि सूर्याची प्रखरता होती, असे मला वाटते. त्यांच्या सहवासात राहणे म्हणजे पर्वणीच. ‘कट्यार’ तर आमच्यासाठी गुरूकुलच होते. एक गायक, अभिनेते, असे वेगवेगळ्या प्रकारे ते आम्हाला मार्गदर्शन करत. खॉँसाहेबांच्या भूमिकेत ते भरभरून जगले. ते जसे आहेत तसे त्यामध्ये होते. अब्बाजानची ती हाक मी कोणत्या झरीणमधून आणू ही शेवटच्या प्रयोगाची बापूंची आठवण सांगताना तर फय्याज गहिवरल्या होत्या.अलीकडे संगीतक्षेत्रात मोठ्या प्रमाणात तांत्रिकीकरण झाले आहे. मात्र, संगीताचा आत्मा असलेल्या अभिजात शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक, कलाकारांची नवोदितांना माहिती नाही. अशा वेळी या संगीताचे काय होणार, अशी चिंता वाटते.- अशोक रानडे, संगीत समीक्षक