शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बस कारला धडकून दोन ठार

By admin | Updated: March 16, 2015 00:13 IST

वेळेजवळ अपघात : मृतांत आरोग्यसेवक संघटनेच्या अध्यक्षांचा समावेश

भुर्इंज : पुणे-बंगलोर महामार्गावर वेळे (ता. वाई) गावच्या हद्दीत कारला व्हॉल्व्हो बसने पाठीमागून ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघेजण ठार झाले. मृतांमध्ये जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितीन भोसले व आरोग्य सहायक महेश वाघमारे यांचा समावेश असून, अन्य दोनजण जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, भोसले, वाघमारे व इतर दोघे शनिवारी कार (एमएच ११ ७७९४)मधून कामानिमित्त पुण्याला गेले होते. रात्री ११.३० च्या सुमारास परतताना वाटेत हॉटेलमध्ये त्यांनी जेवण घेतले. त्यानंतर दुभाजक ओलांडून सातारच्या दिशेने वळत असताना पाठीमागून आलेल्या बसने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, कारमधील चौघेही बाहेर फेकले गेले व कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी जाळीवर आदळली. नितीन भोसले यावेळी कार चालवीत होते. त्यांना शिरवळ येथील जगताप हॉस्पिटलमध्ये, तर महेश वाघमारे यांना कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी हलविण्यात आले; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कारमधील दत्ता यादव (रा. कामाठीपुरा, सातारा) व संजय क्षीरसागर (रा. कृष्णानगर, सातारा) हे गंभीर जखमी झाले आहेत. (आणखी वृत्त ३ वर)सीसीटीव्ही फुटेज तपासणारवेळेचे सरपंच दशरथ पवार व गावकऱ्यांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान, अपघातग्रस्त बसच्या शोधासाठी भुर्इंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक गजानन मोरे यांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. तसेच, महामार्गावर आनेवाडी येथे असलेल्या टोलनाक्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहे, असे भुर्इंज पोलिसांनी सांगितले.