फार्मच्या भिंतीवरून उड्या मारून आत शिरले; पूनावाला स्टड फार्ममधील ४ चंदनाची झाडे चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:03 IST2026-03-04T17:03:23+5:302026-03-04T17:03:36+5:30

स्टड फार्ममधील सुरक्षारक्षक कुंदन शर्मा, सरजित सिंग आणि इंद्रजित गुप्ता यांना मारहाण केली. त्यांना शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी चंदनाची चार झाडे कापून नेली

Jumped over the farm wall and entered; 4 sandalwood trees stolen from Poonawalla Stud Farm | फार्मच्या भिंतीवरून उड्या मारून आत शिरले; पूनावाला स्टड फार्ममधील ४ चंदनाची झाडे चोरीला

फार्मच्या भिंतीवरून उड्या मारून आत शिरले; पूनावाला स्टड फार्ममधील ४ चंदनाची झाडे चोरीला

पुणे: पूनावाला स्टड फार्ममध्ये शिरलेल्या चाेरट्यांनी सुरक्षारक्षकांना मारहाण करून चंदनाची चार झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चंदन चोरांविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत परमेश्वर हिरामण कोळी (४०, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रोड) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावर थेऊर परिसरात पूनावाला स्टड फार्म आहे. चार दिवसांपूर्वी मध्यरात्री चार चोरटे पूनावाला स्टड फार्मच्या भिंतीवरून उड्या मारून शिरले. स्टड फार्ममधील सुरक्षारक्षक कुंदन शर्मा, सरजित सिंग आणि इंद्रजित गुप्ता यांना मारहाण केली. त्यांना शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी चंदनाची चार झाडे कापून नेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के पुढील तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी बंगले, सोसायटी तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांच्या आवारात शिरून चंदनाची झाडे कापून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title : दीवार फांदकर पूनावाला फार्म में घुसे चोर, चंदन के पेड़ चुराए

Web Summary : पुणे के पास पूनावाला स्टड फार्म में चोरों ने घुसकर सुरक्षाकर्मियों पर हमला किया और चंदन के चार पेड़ चुरा लिए। लोनी कालभोर पुलिस ने मामला दर्ज कर चंदन चोरी की जांच कर रही है, जो इलाके में तेजी से बढ़ रही है।

Web Title : Theives Jumped Walls, Stole Sandalwood Trees from Poonawalla Farm

Web Summary : Thieves broke into the Poonawalla Stud Farm near Pune, assaulting guards and stealing four sandalwood trees. Loni Kalbhor police have registered a case and are investigating the sandalwood theft, which is increasingly common in the area.