पाण्यात उडी मारली अन् वर आलाच नाही; नीरा डाव्या कालव्यात बुडाला १३ वर्षांचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 22:26 IST2024-12-16T20:45:44+5:302024-12-16T22:26:34+5:30
आपत्ती व्यवस्थापनच्या २० कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू ठेवले असून अजूनही मुलाचा शोध लागला नाही

पाण्यात उडी मारली अन् वर आलाच नाही; नीरा डाव्या कालव्यात बुडाला १३ वर्षांचा मुलगा
सोमेश्वरनगर (ता. बारामती) : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या कारखाना तळावरील ऊसतोडणी मजुराचा मुलगा सुनील किसन सव्वाशे (वय १३ वर्षे) हा नीरा डावा कालव्यात बुडाला.
रविवार (दि. १५) रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली. सुनील हा आपल्या मित्रांसोबत ऊसतोडणी कामगार वसाहत शेजारी नीरा डाव्या कालव्यावर पोहण्यासाठी आला होता. त्याने कालव्यात पोहण्यासाठी उडी मारली. त्यानंतर तो पाण्यातून वर आलाच नाही. रविवारपासून स्थानिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागला नाही. सोमवार (दि. १६) रोजी दुपारी एकच्या दरम्यान पुणे येथील आपत्ती व्यवस्थापनची टीम सोमेश्वर कारखाना परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांनी नीरा डावा कालवा परिसरातील लोखंडी पूल येथे त्याचा शोध घेतला. पाच ते सहा तासांहून अधिक वेळ प्रयत्न करूनही त्यांना बुडालेल्या सुनीलचा तपास लागलेला नाही. आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी सुशीलकुमार सेठी यांच्यासह पथकातील २० कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू ठेवले होते. मात्र, यामध्ये सुनीलचा तपास लागला नाही.