सागर कोल्हेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:20 IST2021-03-13T04:20:01+5:302021-03-13T04:20:01+5:30

शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसैनिकांच्या वतीने शिरूर शहरातील जुन्या नगर-पुणे रोडवर आंदोलन झाले. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे ...

Jode Maro Andolan to the image of Sagar Kolhe | सागर कोल्हेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

सागर कोल्हेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसैनिकांच्या वतीने शिरूर शहरातील जुन्या नगर-पुणे रोडवर आंदोलन झाले. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सल्लागार अनिल काशीद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, उपतालुका प्रमुख आनंदराव हजारे, अमोल हरगुडे, महिला आघाडीच्या सुमन वाळुंज यासह शिरूर तालुका व शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेची १५ वर्षे अविरतपणे सेवा करणारे शिवसेना उपनेते व माजी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्‍याबद्दल खासदार अमोल कोल्हे यांचे बंधु सागर कोल्हे यांनी एकेरी उल्लेख करून सुसंस्कृत नसल्याचा दाखला दिला असून शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसैनिकांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करत असून यापुढे असा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार यांनी दिला आहे.

Web Title: Jode Maro Andolan to the image of Sagar Kolhe