शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयाने प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने नोकरी गेली; विद्यार्थ्याचा दावा, कॉलेजने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 13:48 IST

विद्यार्थी महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असून त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येत असल्याचे कॉलेजने स्पष्टीकरण दिले आहे

पुणे : मॉडर्न कोलॅजेमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने कॉलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याचा दावा करत आपल्याला ब्रिटनमधील कंपनीतील नोकरी गमवावी लागली असल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला आहे. या प्रकरणात कॉलेजने आपली बाजू मांडत हा विद्यार्थी महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. प्रेम बिऱ्हाडे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. 

महाविद्यालयाच्या प्रशासनाने जातीय भेदभाव करून व्हेरिफिकेशन केले नाही,’ असा आरोप प्रेमने केला होता. कॉलेजने सर्व आरोप फेटाळले असून, विद्यार्थ्याला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे सांगितले आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणात उडी घेतली आहे. मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायकारक वर्तनाचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेने कॉलेजसमोर आंदोलन केले आहे. प्रेम बिऱ्हाडे याला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी मागणी केली आहे. 

प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्याने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये प्रेमने २०२०-२४ या कालावधीत बीबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर उच्चशिक्षणासाठी प्रेम ब्रिटनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स’मध्ये गेला. या विद्यापीठात प्रवेशासाठी कॉलेजने विद्यापीठाला दोन पत्रे दिली. दरम्यानच्या कालावधीत प्रेमला नोकरीची संधी मिळाली. काही दिवसांनी प्रेमच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ब्रिटनमधील कंपनीने ई-मेलद्वारे कॉलेजला विचारणा केली. मात्र, कॉलेजने पडताळणीला टाळाटाळ केल्याने, स्वत: प्रेमने विभागप्रमुख, उपप्राचार्य आणि प्राचार्यांशी संपर्क साधून पडताळणी करून, प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला. मात्र, प्राध्यापकांनी आपल्याला जातीबाबत माहिती विचारून, वरिष्ठांच्या आदेशावरून प्रमाणपत्र देता येणार नाही, असे सांगितल्याचा दावा प्रेमने केला आहे.

प्राचार्यांचे स्पष्टीकरण 

प्रेम हा महाविद्यालयाच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याचे प्राचार्य डॉ निवेदिता एकबोटे यांनी सांगितले आहे. त्यांची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येतात. संबंधित विद्यार्थ्याबाबत पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्यास, प्राध्यापक वर्गाचा छळ आणि महाविद्यालयाची बदनामी थांबेल,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Job lost due to college's delay in certificate issuance: Student alleges.

Web Summary : A student claims he lost a UK job due to Modern College's delayed certificate. The college denies the allegations, stating the student is defaming them. A political party protested in support of the student, demanding justice.
टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयLondonलंडनEducationशिक्षणProfessorप्राध्यापकSocial Mediaसोशल मीडियाStudentविद्यार्थी