शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

भोर नगराध्यक्षपदी जयश्री शिंदे

By admin | Updated: August 28, 2015 04:32 IST

नगरपलिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अ‍ॅड. जयश्री राजकुमार शिंदे राष्ट्रवादीच्या राजश्री विजय रावळ यांचा १२ विरुद्ध ४ मतांनी पराभव करून नगराध्यक्षपदी निवडून आल्या.

भोर : नगरपलिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अ‍ॅड. जयश्री राजकुमार शिंदे राष्ट्रवादीच्या राजश्री विजय रावळ यांचा १२ विरुद्ध ४ मतांनी पराभव करून नगराध्यक्षपदी निवडून आल्या.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे यांनी काम पहिले. या वेळी मुख्याधिकारी संजय केदार व सर्व नगरसेवक उपस्थित होते.भोर शहरात अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी दीपाली शेटे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले होते. शेटे या नगराध्यक्षाही होत्या. परिणामी त्यांचे नगराध्यक्षदही रद्द झाले होते. त्यानंतर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार ही निवडणूक घेण्यात आली. यात जयश्री शिंदे यांना १२, तर राजश्री रावळ यांना ४ मते मिळाली. ८ मतांनी जयश्री शिंदे नगराध्यक्षपदावर निवडून आल्या आहेत.दरम्यान, नगराध्यक्ष निवडीनंतर आमदार संग्राम थोपटे यांनी जयश्री शिंदे यांचा सत्कार केला. या वेळी प्रदीप खोपडे, शैलेश सोनवणे, सतीश चव्हाण, उमेश देशमुख, चंद्रकांत सागळे, सुवर्णा मळेकर, गीतांजली शेटे, रामनाना सोनवणे, दिलीप बाठे, डॉ. विजयाल पाठक, किसन वीर, तानाजी तारू, नंदा जाधव, वंदना दिघे, पल्लवी सोनवणे, राजकुमार शिंदे, निसार नालबंद, तुकाराम रोमण व नगरिक उपस्थित होते.या वेळी थोपटे म्हणाले, ‘‘चुकीच्या पद्धतीने शासकीय नियम धाब्यावर बसवून नगराध्यक्षपदाचा गैरवापर करून शहराला वेठीस धरणाऱ्यांचा पुरता धुराळा उडाला आहे. शिंदे यांच्या माध्यमातून विकासाला गती दिली जाईल.’’हा संघर्ष कोणत्याही पदासाठी नव्हता, तर लोकांना वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात होता. त्याला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळाला आणि सत्याचा विजय झाला आहे. असल्याचे नगराध्यक्षा जयश्री शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)