शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आयएसएमटीने काम थांबविले!

By admin | Updated: July 13, 2015 23:57 IST

मालाला उठाव नसल्याचे कारण सांगून बारामती एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीने कामकाज स्थगिती जाहीर केली आहे. याबाबत प्रवेशद्वारवरच नोटीस लावली आहे.

बारामती : मालाला उठाव नसल्याचे कारण सांगून बारामती एमआयडीसीतील आयएसएमटी कंपनीने कामकाज स्थगिती जाहीर केली आहे. याबाबत प्रवेशद्वारवरच नोटीस लावली आहे. कामगारांना कंपनीत प्रवेश नाकारण्यात आला आहे.कंपनीच्या ४५४ कामगारांपैकी केवळ २६ कामगारांना कंपनीत प्रवेश देण्यात आला आहे. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल मेंटेनन्स, एम्प्लॉई रिलेशन विभागातील हे २६ कर्मचारी आहेत. कंपनीमध्ये सिमलेस ट्यूबचे उत्पादन केले जाते़ बाजारात तीव्र स्वरूपाची स्पर्धा आहे. विशेषत: चीनमधून येणाऱ्या उत्पादनाची स्पर्धा तीव्र स्वरूपाची आहे. चीनचा माल प्रचंड प्रमाणात आयात करून साठवला जात आहे. चीनच्या मालाची विक्री किंमत या कंपनीच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. त्यामुळे त्या मालाबरोबर येथील कंपनी स्पर्धा करू शकत नाही. त्याच वेळी सरकार ‘अँटी डंपिंग ड्युटी’ लावण्यासारख्या उपाययोजना करीत नाही. त्यामुळे परिस्थिती व्यवस्थापनाच्या आवाक्याबाहेर गेली आहे.तसेच एमएसईडीसीएल या विद्युत वितरण कंपनीने कराराचा भंग केल्याने आपल्याला वीजनिर्मिती प्रकल्प बंद करावा लागला. त्याचा उत्पादन खर्चावर मोठा परिणाम झाला. या सर्व परिणामांमुळे कंपनीला उत्पादनप्रक्रिया सुरू ठेवणे आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे नमुनेदार आदेशाचे स्थायी कलम १८ प्रमाणे कामकाज स्थगिती जाहीर करण्यात येत आहे. संबंधित कामगारांना स्थायी आदेश कलम १९ प्रमाणे त्यांची रजा शिल्लक असल्यास, त्यांनी मागणी केल्यास पगारी रजा देण्यात येतील. रजा शिल्लक नसल्यास, तसेच मागणी न केल्यास हा कालावधी बिनपगारी रजा म्हणून समजण्यात येणार आहे, असे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. यावर कंपनीचे उपाध्यक्ष बलराम अग्रवाल यांची स्वाक्षरी आहे.कंपनी व्यवस्थापनाने लावलेली नोटीस बेकायदेशीर आहे. याबाबत व्यवस्थापनाशी शांततेच्या मार्गाने चर्चा सुरू आहे. कंपनीच्या या निर्णयानंतर कामगारांना प्रवेशद्वारातच अडविण्यात आले आहे. कामगार दिवसभर उन्हात बसून आहेत. मालक बी. आर. तनेजा यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी कामगार आयुक्तालयात शिष्टमंडळ पाठविले आहे. आज उशिरापर्यंत व्यवस्थापनाशी चर्चा सुरूआहे, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासोा थोरात यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सुधारणा झाल्यानंतर प्रकल्प पुन्हा सुरू होईलआएसएमटी कंपनीचे उपाध्यक्ष बलराम आग्रवाल यांच्या वतीने कंपनीच्या सूत्रांनी सांगितले, की हा निर्णय नियमानुसार घेण्यात आला आहे. व्यवस्थापन कामगारांच्या हिताला बाधा येणार नाही, यासाठी दक्ष आहे. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचा करार संपुष्टात आला आहे. याबाबत बोलणी सुरू आहेत. जेजुरी, नगर येथील प्रकल्पांतील उत्पादने वेगळी आहेत. त्या उत्पादनांना बाजारात मागणी आहे. परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यानंतर प्रकल्प पुन्हा सुरू होईल. हा निर्णय कायमस्वरूपी नाही; मात्र तो मागे घेण्याबाबत कालावधी निश्चित सांगू शकत नाही, असे कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.बोनसचा वादही न्यायालयातबारामती शहरात २५ वर्षांपासून ही कंपनी सुरू आहे. १९९० मध्ये कल्याणी ग्रुपने या कंपनीचे बांधकाम केले. तर, प्रत्यक्षात १९९३ मध्ये उत्पादनाला सुरुवात झाली. २००० मध्ये बाबा कल्याणी यांच्याकडून बी. आर. तनेजा यांनी ही कंपनी घेतली. दिवाळीपासून कामगार आणि व्यवस्थापनामध्ये बोनस प्रश्नावरून वाद सुरू आहे. हा वाद सध्या अंतिम टप्प्यात न्यायालयात सुरू आहे. आर्थिक परिस्थितीमुळे वेतनाबाबत अनियमितता असल्याची कामगारांची तक्रार आहे.