शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायची देवेंद्र फडणवीस यांची तयारी आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:05 IST

केंद्रामध्ये महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी विरोध केल्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.

पुणे : महिला आरक्षणाची भ्रूणहत्या १९५१ मध्ये झाली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विधेयक मांडले होते. त्याला विरोध झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी राजीनामा दिला होता. महिलांसाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायची देवेंद्र फडणवीस यांची तयारी आहे का, असा सवाल उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला. भाजप खरोखर पुरोगामी विचारसरणीचा असेल तर त्यांनी २०२९च्या लोकसभेत सत्तेवर आल्यास महिला पंतप्रधान आणि महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्रिपद द्यावे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक सरसंघचालकपदीही महिला नियुक्त करावी. याला आमचाही पाठिंबा असेल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रामध्ये महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी विरोध केल्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या विविध मुद्द्यांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्र्यांनी ‘विरोधकांनी विधेयकाची भ्रूणहत्या केली’ असा उल्लेख केला होता. त्यावर अंधारे यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा उल्लेख करून विरोधकांवर टीका केली. त्यावर ‘महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेल्या गुलामगिरी’ आणि शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकांचे जाहीर वाचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक कार्यक्रमात करणार का? असे आव्हान सुषमा अंधारे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिले. २० आणि २२ स्पटेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महिला आरक्षण विधेयक संमत झाल्याचे केलेले ट्विट अंधारे यावेळी दाखविले.

महिलांना आरक्षण द्यायचेच असेल तर ५४३ मधून द्या, असे सांगतानाच जनगणनेनंतर लोकसभेनंतर लोकसंख्येनुसार खासदारांची संख्या वाढणार असल्याचे सांगितले जात असले तरी दक्षिणेतल्या खासदारांची संख्या आहे तेवढीच राहणार आहे. उत्तरेतील मात्र खासदारांची संख्या वाढणार असून, दक्षिण आणि उत्तरेतील हा वाद निर्माण करण्याची भारतीय जनता पक्षाला गरजच काय होती, असाही सवाल खरात यांनी उपस्थित केला. भोंदू अशोक खरात याची मालमत्ता १५ हजार कोटी असल्याचे बोलले जात असून, याची सखोल चौकशी करावी तसेच खरात याची सुरक्षितता वाढावी, कारण अनेक मोठी नावे यातून बाहेर येऊ शकतात,’ अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis questioned on resignation for women's cause by Sushma Andhare.

Web Summary : Sushma Andhare questions Fadnavis' commitment to women's rights. She challenged BJP to appoint a female PM, CM, and RSS chief. Andhare criticizes Fadnavis' remarks on women's reservation bill, urging RSS to publicly read works by Mahatma Phule. She also demanded inquiry into Ashok Kharat's assets.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे