आयआरसीटीसीतर्फे श्री रामेश्वरम–तिरुपती दक्षिण दर्शन; १० दिवसांची विशेष यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:25 IST2025-10-23T12:25:00+5:302025-10-23T12:25:36+5:30
नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणी प्रवाशांना बोर्डिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे

आयआरसीटीसीतर्फे श्री रामेश्वरम–तिरुपती दक्षिण दर्शन; १० दिवसांची विशेष यात्रा
पुणे: इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) वतीने एक विशेष धार्मिक पर्यटन “श्री रामेश्वरम–तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा” जाहीर करण्यात आले आहे. ही १० दिवसांची विशेष यात्रा भारत गौरव पर्यटक रेल्वेद्वारे पार पडणार असून, दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन या यात्रेमध्ये घडवले जाणार आहे.
ही यात्रा ७ नोव्हेंबर २०२५ रोजी नाशिक येथून सुरू होऊन १६ नोव्हेंबर २०२५ रोजी समाप्त होईल. तिरुपती बालाजी मंदिर दर्शनासाठी प्रवाशांनी दर्शनाची तिकिटे स्वतंत्रपणे ऑनलाइन बुक करावी लागतील. त्यासाठी नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणी प्रवाशांना बोर्डिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यात्रेतील प्रमुख स्थळे
• तिरुपती – लार्ड वेंकटेश्वरनस्वामी मंदिर, पदमावती मंदिर
• रामेश्वरम – रामनाथस्वामी मंदिर व धनुष्कोडी
• मदुराई – मीनाक्षी मंदिर
• कन्याकुमारी – विवेकानंद रॉक मेमोरियल, गांधी मंडपम व कन्याकुमारी मंदिर
• तिरुवनंतपुरम – पद्मनाभस्वामी मंदिर व कोवलम बीच