स्मार्ट सिटीसाठी संस्था, संघटनांचा पुढाकार

By Admin | Updated: September 21, 2015 04:14 IST2015-09-21T04:14:29+5:302015-09-21T04:14:29+5:30

केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे शहराचा समावेश व्हावा, याकरिता पुणे महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या

Institutions for Smart City, Organizational Initiatives | स्मार्ट सिटीसाठी संस्था, संघटनांचा पुढाकार

स्मार्ट सिटीसाठी संस्था, संघटनांचा पुढाकार

पुणे : केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे शहराचा समावेश व्हावा, याकरिता पुणे महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी अभियानाला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी शहरातील विविध व्यावसायिकांच्या संघटना, स्वयंसेवी संस्था पुढाकार घेणार आहे. शनिवारी आयुक्त कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिनिधींना स्मार्ट सिटी अभियानाची सविस्तर माहिती देण्यात आली.
स्मार्ट सिटी योजनेमध्ये कशाला प्राधान्य देण्यात यावे, त्यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असावा, याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने राज्य शहरातील नागरिकांची मते जाणून घेतली
जात आहेत. त्याचाच एक भाग
म्हणून शहरातील विविध व्यावसायिकांच्या संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी आयुक्त कार्यालयामध्ये घेण्यात आली. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राजेंद्र जगताप, उपायुक्त अनिल पवार, मंगेश दिघे
उपस्थित होते.
स्मार्ट सिटी अभियान काय आहे, त्याअंतर्गत शहराचा काय विकास होणार आहे, त्याचे विविध टप्पे कसे आहेत, याचे अनिल पवार यांनी सविस्तर सादरीकरण केले. विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्न, शंकाचे या वेळी समाधान करण्यात आले. पालिकेचे कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी घरोघर जाऊन नागरिकांच्या स्मार्ट सिटीकडूनच्या अपेक्षा जाणून घेत आहेत. नागरिकांकडून एक छोटी प्रश्नावली असलेला अर्ज भरून घेतला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Institutions for Smart City, Organizational Initiatives