अमानुष... हृदयद्रावक... संतापजनक चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने हत्या; नराधमाने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 08:39 IST2026-05-03T08:39:09+5:302026-05-03T08:39:53+5:30
पुण्यातील भोर तालुक्यातील घटनेने संतापाची लाट, पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन, नराधमाला मृत्युदंडाची होणार शिक्षा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

अमानुष... हृदयद्रावक... संतापजनक चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने हत्या; नराधमाने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला
पुणे, नसरापूर: साडेतीन वर्षीय चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून खून केला. क्रूरतेचा कळस म्हणजे दगडाने ठेचलेला मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याची धक्कादायक घटना नसरापूर (ता. भोर) परिसरात उघडकीस आली असून, पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी मोर्चा काढून बंद पुकारला. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
नक्की काय घडले?
उन्हाळ्याच्या सुटीसाठी चिमुकली आजीकडे आली होती. दरम्यान शुक्रवारी नराधमाने तिला आमिष दाखवून जनावरांच्या गोठ्याकडे नेले. ४ वाजेपर्यंत मुलगी घरी परत न आल्यामुळे नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. त्याचवेळी गावातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात आरोपी मुलीला घेऊन गेल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी आरोपीचा शोध घेतला आणि बनेश्वर फाट्यावरून पकडून आणून चोप दिला. चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपवून ठेवलेली जागा सांगितली. २ शेणाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह पुरला होता. चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला.
आरोपीला ताब्यात द्या, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्ग शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अडवला. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेतला.
आरोपीवर यापूर्वी बलात्काराचे दोन गुन्हे
भीमराव प्रभाकर कांबळे (६५) हा मूळचा भोर तालुक्यातील साळवडे येथील रहिवासी आहे. साळवडे गावाने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गावाबाहेर काढले होते. तो नसरापूर बाजारपेठेच्या ठिकाणी मोलमजुरीसाठी येत असे. आरोपीवर यापूर्वी बलात्काराचे दोन गुन्हे दाखल आहेत. १९९८ आणि २०१५ साली बलात्काराचे गुन्हे दाखल असून आरोपीने ४ वर्षे कारावास भोगला आहे. सध्या कुणाच्या बांधकामावर, तर कोणाच्या शेतात मोलमजुरी करीत असे.
नसरापूर घटनेप्रकरणी नागरिकांनी मुंबई-पुणे हायवेवर आंदोलन केले होते, त्यामुळे वाहतूककोंडी झाली होती.
नसरापूर अत्याचार प्रकरण घटनाक्रम
शुक्रवार दु. ३ वा. पीडित चिमुकली शेवटची राम मंदिर भागात दिसली.
दु. ३:४५ वा. मुलगी घरी न आल्याने आजीकडून मुलीचा शोध सुरू.
दु. ४ वा. ग्रामस्थांकडून शोध सुरू.
दुपारी ४:३० वा. सीसीटीव्ही शोधले तेव्हा आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला.
संध्या. ५:३० वा. ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणला, चोप मिळताच आरोपीने मुलीचा मृतदेह लपवलेली जागा सांगितली. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
सायं. ६ वा. शेणाच्या ढिगाऱ्यातून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक.
संध्या. ७ वा. ग्रामस्थांनी पोलिसांना जागेवरच घेराव घातला. वादानंतर पोलिसांनी मृतदेह हलवला.
रात्री ८:०० वा. ग्रामस्थांचा राजगड पोलिस स्टेशनला घेराव.
रात्री ९:०० वा. गावकऱ्यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी झाली.
रात्री ११ वा. एसपी गिल दाखल झाले. लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी रास्तारोको मागे घेतला.
शनिवार सकाळी ७:०० वा. नसरापुरात कडकडीत बंद.
पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको
नसरापूर (भोर) येथे बालिकेवर अत्याचार करून निघृण हत्या केल्याच्या घटनेने परिसर संतापाने पेटला आहे. आरोपी भीमाजी कांबळे याला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हजारो महिला व नागरिकांनी शनिवारी भैरवनाथ मंदिराजवळ जमून निषेध मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोकोही केला. घटनेप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
अत्यंत निंदनीय आणि दुःखद ही घटना आहे. मी आश्वस्त करू इच्छितो की, फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही हे प्रकरण नेऊ. आम्ही हायकोर्टाला विनंती करू, या नराधमाला मृत्युदंडाची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार आहोत.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही सुरक्षित नाहीत. हे गृहविभागाचे अपयश असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
नसरापूर येथे बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येचा प्रकार संतापजनक आहे. खरंतर यापूर्वी त्याने असेच गुन्हे केलेले असताना, त्याला जामिनावर सोडलेच कसे?, गावाने हाकलून दिलेला माणूस नसरापूरमध्ये आलाच कसा?
सुप्रिया सुळे, खासदार.
चाकणमध्ये बालकावर अत्याचार करून खून
चाकण : औद्योगिक क्षेत्रातील खालुंबे (ता. खेड) येथून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सोळा वर्षीय मुलाकडून केवळ तीन वर्षाच्या निष्पाप बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे.
ही घटना (१ मे) चाकण औद्योगिक क्षेत्रातील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पीडित चिमुकला आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ तो परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र काहीच सुगावा न लागल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
आरोपी हा मूळचा बिहार राज्यातील आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी स्वतःही अल्पवयीन असून पळून जाण्याच्या तयारीत होता.
या प्रकरणातील गुन्हेगाराने 66 यापूर्वदिखील अशाच प्रकारची कृत्ये केली होती. त्यावेळी तो पकडलाही गेला होता. उद्या जर हा परत बेल घेऊन बाहेर येणार असेल, तर या कायद्याचे करायचे काय?, अशी लोकांची भावना - रोहित पवार, आमदार आहे.
अवघ्या बारा तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या
संशयास्पद स्थितीत ठेवलेल्या बॅगेची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये त्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. शेजारील एका खोलीत
संबंधित बालकावर आधी लैंगिक २ अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून निघृणपणे खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक माहिती, मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढला.