तडीपार गुन्हेगाराचा इंदिरानगला राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:08 IST2021-01-01T04:08:22+5:302021-01-01T04:08:22+5:30

पुणे : तडीपार असताना गुलटेकडी येथील इंदिरानगर येथे येऊन कोयता घेऊन गुन्हेगाराने गाेंधळ घातला. यावेळी पत्नीला भेटायला आलेल्या तरुणावर ...

Indiranagala Radha of Tadipar criminal | तडीपार गुन्हेगाराचा इंदिरानगला राडा

तडीपार गुन्हेगाराचा इंदिरानगला राडा

पुणे : तडीपार असताना गुलटेकडी येथील इंदिरानगर येथे येऊन कोयता घेऊन गुन्हेगाराने गाेंधळ घातला. यावेळी पत्नीला भेटायला आलेल्या तरुणावर काेयत्याने वार करुन त्यांना जबर जखमी केले.

फैजल ऊर्फ गट्टया करीम शेख (वय २८, रा. इंदिरानगर, गुलटेकडी) या सराईत गुन्हेगारविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शेख याला पोलिसांनी तडीपार केले आहे. असे असताना तो २९ डिसेंबरला रात्री ११ वाजता गुलटेकडीतील इंदिरानगरमध्ये दारु पिऊन आला. हातातील कोयता हवेत फिरवुन गाेंधळ घालू लागला. अभी मेरी तडीपारी खत्म होने को है, क्या कोई माई का लाल जो मुझे ठसन दे, असे म्हणून लोकांना काेयत्याचा धाक दाखवू लागला. यावेळी वसिम अन्सारी (वय ३०, रा. कोंढवा) माहेरी आलेल्या पत्नीला भेटण्यासाठी आले होते. शेख अन्सारी यांच्यावर धावून गेला व जुन्या भांडणाच्या रागातून त्याने रस्त्यावरील दगड उचलून अन्सारी यांच्या डोक्यात मारला. काेयत्याने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Indiranagala Radha of Tadipar criminal