शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीतून वाढतेय अवयवदान साक्षरता

By admin | Updated: May 9, 2017 03:36 IST

गेल्या काही वर्षांमध्ये नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. झोनल ट्रान्सप्लांट को-आॅर्डिनेशन

गेल्या काही वर्षांमध्ये नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. झोनल ट्रान्सप्लांट को-आॅर्डिनेशन कमिटीतर्फे रुग्णालयांची नोंदणी, आवश्यकता यानुसार प्रतीक्षा यादी तयार केली जाते. जात, धर्म, आर्थिक, सामाजिक, राजकीय असा कोणताही दबाव न जुमानता रुग्णाची परिस्थिती, तातडीची गरज यानुसारच अवयवदानाचा निर्णय घेतला जातो. सध्या झेडटीसीसीकडे साधारणपणे २०० यकृते, ८ हृदये व ५०० हून अधिक मूत्रपिंडांसाठी प्रतीक्षा यादी आहे, अशी माहिती झेडटीसीसीच्या पुणे समन्वयक आरती गोखले यांनी दिली.झेडटीसीसीतर्फे अवयवदान जनजागृती आणि समन्वयाचे काम केले जाते. त्यासाठी समितीतर्फे ५२ मिनिटांचा ‘फिर जिंदगी’ नावाचा लघुपट तयार केला आहे. समितीचे संकेतस्थळ तसेच फेसबुक पेजच्या माध्यमातून तसेच शाळा, महाविद्यालये, रोटरी क्लब, आयटी कंपन्या आदी विविध ठिकाणी जाऊन अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार केला जातो, असे गोखले यांनी सांगितले.२०१२पासून पुण्यात १०४ यकृते, ३ हृदये तसेच मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. एकाहून अधिक अवयव प्रत्यारोपणासाठी सध्या समितीकडे साधारणपणे १२ रुग्णांची नोंदणी झाली आहे. प्रत्येक अवयव प्रत्यारोपणाचे निकष आणि प्रतीक्षा यादी तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचार घेत असताना प्रत्यारोपणासाठी नोंद करतात. ही नोंदणीची यादी सर्व रुग्णालयांकडून झेडटीसीसीला पाठविली जाते. झेडटीसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे प्रत्येक अवयवाची वेगवेगळी प्रतीक्षा यादी तयार केली जाते. काही रुग्णांनी दोन किंवा अधिक अवयव प्रत्यारोपणासाठी अर्ज केलेला असतो. यकृतासाठी रोटेशनप्रमाणे यादी ठरविली जाते. डायरेक्टरेट आॅफ हेल्थ सर्व्हिसेस (डीएसएस)तर्फे पुण्यात केवळ रुबी हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची परवानगी देण्यात आली आहे.कोणत्या शहरातील कोणत्या रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाची नितांत गरज आहे, याची प्रतीक्षा यादी झेडटीसीसीकडे तयार असते. रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यास अवयवदानासाठी रुग्णाच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले जाते. नातेवाइकांनी अवयवदानाची तयारी दर्शविल्यावर उपलब्ध झालेले अवयव आणि ते कोणत्या रुग्णालयापर्यंत पोहोचवायचे आहेत, याचे अचूक नियोजन करून ग्रीन कॉरिडॉर केला जातो. याबाबत झेडटीसीसीतर्फे पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त यांच्याशी संपर्क साधून ग्रीन कॉरिडॉर आखला जातो. रुग्णालयातून अवयव घेऊन डॉक्टरांची टीम निघाल्यापासून ईप्सित स्थळी पोहोचेपर्यंत मिनिटा-मिनिटाचा हिशेब झेडटीसीसीकडून ठेवला जातो. रुग्णालयाकडून एखादा अवयव येणे किंवा पाठविणे या संदर्भात ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली जाते; मग त्या त्या चौकातील वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करून नियोजन केले जाते. आॅगस्ट २०१५मध्ये हृदयासाठी पहिला ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. त्यानंतर जानेवारी ते डिसेंबर २०१६पर्यंत ९ वेळा यकृत व ८ वेळा मुंबई, दिल्ली, चेन्नई येथे हदय नेण्यात आले. आॅगस्ट २०१५ ते डिसेंबर २०१६पर्यंत हृदय आणि यकृत मिळून १८ ग्रीन कॉरिडॉर झाले. त्यानंतर पुणे विभागात ३ हृदये आणण्यात आली. यकृत औरंगाबाद, सोलापूर, नाशिक येथून ३ वेळा आणण्यात आले, असे मिळून पुणे विभागात एकूण २५ वेळा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले असल्याची माहिती झोनल ट्रान्सप्लांट को-आॅर्डिनेशन सेंटरच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.झेडटीसीसीच्या महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद अशा चार ठिकाणी शाखा आहे. रोटो-नोटो आणि सोटोच्या अंतर्गत झेडटीसीसी ही समिती कार्यरत आहे. याशिवाय, अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. याचप्रमाणे, रिव्हर फाउंडेशनतर्फे अवयवदानाबाबत लघुपट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये अवयवदानासाठी अर्ज ठेवलेले असतात. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयदानाचे अर्ज भरावेत, यासाठी प्रबोधन केले जाते, असेही आरती गोखले यांनी सांगितले.