शनिवारी शहरात सहा हजार रूग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:10 IST2021-04-18T04:10:41+5:302021-04-18T04:10:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून, शनिवारी दिवसभरात हा आकडा ६ हजार ६ ...

An increase of six thousand patients in the city on Saturday | शनिवारी शहरात सहा हजार रूग्णांची वाढ

शनिवारी शहरात सहा हजार रूग्णांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असून, शनिवारी दिवसभरात हा आकडा ६ हजार ६ रूग्णांनी वाढला. तर, दिवसभरात ५ हजार ६०९ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १२३६ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५४ हजार ९६७ झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १२३६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ५ हजार ७१७ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ५६ झाली आहे. पुण्याबाहेरील २१ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात एकूण ५ हजार ६०९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ९९ हजार ७८० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ३ लाख ६० हजार ८०३ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५४ हजार ९६७ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २४ हजार ५०६ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १८ लाख ५६ हजार ६६३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: An increase of six thousand patients in the city on Saturday