शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्यांच्या भावात वाढ

By admin | Updated: July 3, 2017 02:23 IST

चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा वगळता कांदा, भुईमूग शेंग व लसूण यांची आवक घटली. कांदा व बटाटा भाव वधारले, भुईमूग

लोकमत न्यूज नेटवर्क
आसखेड : चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा वगळता कांदा, भुईमूग शेंग व लसूण यांची आवक घटली. कांदा व बटाटा भाव वधारले, भुईमूग शेंगाचे भाव घसरले. लसणाचे भाव स्थिर राहिले. राजगुरुनगर मार्केटमध्ये या आठवड्यात पालेभाज्यांची आवक घटली. शेलपिंपळगाव उपबाजारात या आठवड्यातही भाज्यांची
आवक घटली. चाकणला पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, शेपू व मेथी आणि पालकची
आवक मंदावली. जनावरांच्या बाजारात म्हशी वगळता, जर्शी गाय, बैल, शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घट झाली. जनावरांच्या बाजारात एकूण उलाढाल १ कोटी ते ७५ लाख रुपये झाली. तर एकूण २ कोटी २० लाख रुपयाची उलाढाल चाकण बाजारात झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ४७५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५५ क्विंटलने कमी झाली. भाव मात्र ७५० रुपयांवरुन ८२५ रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १ हजार ७०५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १४५ क्विंटलने वाढली. कमाल भाव ७५० रुपयांवरून ८०० रुपये झाला. जळगाव भुईमूग शेंगाची एकूण आवक ४० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २० क्विंटलने घटली. या शेंगांचा कमाल भावही ६ हजार २०० रुपयांवरून ५८०० रुपये झाला. या सप्तहातही बंदूक भुईमूग शेंगांची आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ६ क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक व २ क्विंटलने घटली. कमाल भावही ५००० रुपयांवर स्थिर झाले.
हिरव्या मिरचीची एकूण आवक २१४ क्विंटल झाली. भावातही
वाढ झाली. हिरव्या मिरचीला
५००० ते ६५०० रुपये असा कमाल भाव मिळाला.


शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे

कांदा - एकूण आवक - ४७५ क्विंटल. भाव क्रमांक १ - ८२५ रुपये, भाव क्रमांक २ - ६५० रुपये, भाव क्रमांक ३ - ५०० रुपये. बटाटा - एकूण आवक - १७०५ क्विंटल. भाव क्रमांक १ - ८०० रुपये, भाव क्रमांक २ - ७०० रुपये, भाव क्रमांक ३ - ५०० रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांची एकूण आवक व भाव :
टोमॅटो - ६०८ पेट्या (१५०० ते ३५००रुपये), कोबी २०१ (१००० ते १४००रुपये), फ्लॉवर - ३६१ पोती (५०० ते १०००रुपये),
वांगी - १६१ पोती (३५०० ते ४५०० रुपये), भेंडी - २३५ पोती
(४००० ते ५००० रुपये), दोडका ९७ (३०००ते ४०००),
कारली - १६८ डाग (३००० ते ४००० रुपये), दुधीभोपळा - १९४ पोती (५०० ते १५०० रुपये), काकडी - १८४ पोती ( १००० ते २००० रुपये), गवार - १६७ पोती (२५०० ते ३५००), फरस बी ४७ (४०००ते ६०००), ढोबळी मिरची ४१९ (३००० ते ४०००), शेवगा - ६७ पोती (३००० ते ४००० रुपये), चवळी ५० (२००० ते ३००० रुपये)


पालेभाज्या : भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व शेकडा भाव : मेथी- एकूण
४ हजार ६९० जुड्या (१००० ते २००० रुपये), कोथिंबीर - एकूण ५ हजार ९१० जुड्या (२००० ते ३००० रुपये), शेपू - २ हजार ४६० जुड्या
(१००० ते १५००), पालक - ३ हजार ६४८
जुड्या (५०० ते ८०० रुपये)

जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ५० जर्शी गार्इंपैकी ३५ गार्इंची विक्री झाली. (१०,००० ते ५०,००० रुपये), १५५ बैलांपैकी ९५ बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ३०,००० रुपये), १२० म्हशींपैकी ७० म्हशींची विक्री झाली (२०,००० ते ७०,००० रुपये), ८७२५ शेळ्या-मेंढ्यांपैकी ८१०० शेळ्या-मेंढ्यांची विक्री झाली (२,००० ते १०,००० रुपये) अशी जनावरांची विक्री झाली .