शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

पुणे विभागात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत वाढ, बारामतीत १० टँकरने पाणीपुरवठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 7:28 PM

परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देराज्य शासनातर्फे दुष्काळी तालुक्यांची यादीही प्रसिध्द पुणे जिल्ह्यात १६ तर सांगलीमध्ये ३ आणि सोलापूर जिल्ह्यात २ टँकर सुरूपुणे जिल्ह्यातील १३ गावे आणि १४९ वाड्यामध्ये पाणी टंचाई

पुणे: दुष्काळाच्या झळा वाढू लागल्याने पुणे विभागात नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. बुधवारी (दि.१४) पुणे विभागात ४६ टँकरने पाणी पुरवठा केला जात असून त्यात पुणे जिल्ह्यात १६ टँकर सुरू असून त्यातील १० बारामतीत पाणी पुरवठा करत आहेत. तसेच साताऱ्यात सर्वाधिक २६ टँकर सुरू आहेत. विभागातील ८४ हजार ४३७ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहेत.परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनातर्फे दुष्काळी तालुक्यांची यादीही प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळी भागात पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यात सर्वाधिक २५ आणि पुणे जिल्ह्यात १६ तर सांगलीमध्ये ३ आणि सोलापूर जिल्ह्यात २ टँकर सुरू आहेत. त्याचप्रमाणे विभागातील ११ हजार ७८५ जनावरे दुष्काळाने बाधित झाली असून त्यात साताऱ्यातील ९ हजार ९०४ आणि सोलापूरमधील १८८१ जनावरांचा समावेश आहे.पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात सर्वाधिक १० टँकरने पाणीपुरवठा केला जात असून दौंडमध्ये १, पुरंदरमध्ये २, शिरूर तालुक्यात १ आणि जुन्नर तालुक्यात २ टँकर सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातील १३ गावे आणि १४९ वाड्यामध्ये पाणी टंचाई आहे. तर साताऱ्यातील २८ गावे आणि १४२ वाड्या बाधित झाल्या असून माण, खटाव, कोरेगाव तालुक्यात  दुष्काळी स्थिती आहे. सांगलीत आटपाडीमध्ये आणि सोलापुरात माढा तालुक्यात नागरिक दुष्काळाने बाधित आहेत.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळSatara areaसातारा परिसरSolapurसोलापूर