शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय टंकलेखन परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ

By admin | Updated: January 23, 2017 03:04 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणकीय टंकलेखन परीक्षा येत्या २७ ते ३१ जानेवारी आणि ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे संगणकीय टंकलेखन परीक्षा येत्या २७ ते ३१ जानेवारी आणि ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत घेतली जाणार आहे. मागील परीक्षेच्या तुलनेत या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. जानेवारी- फेब्रुवारी २०१७ परीक्षेस ५७ हजार ५७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. मागील परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ३० हजार होती. राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे म्हणाले, ‘‘एप्रिल २०१६ पासून संगणकीय टंकलेखन परीक्षा घेतली जात आहे. पहिली संगणकीय टकलेखन परीक्षा एप्रिल २०१६ मध्ये, तर दुसरी आॅगस्ट २०१६ मध्ये, तर तिसरी परीक्षा डिसेंबर २०१६ मध्ये घेण्यात आली. दुसऱ्या परीक्षेस सुमारे ३० हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तर डिसेंबर महिन्यातील पुरवणी परीक्षेस केवळ ३५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ३० व ४० शब्द प्रतिमिनिट (श.प्र.मि.) टंकलेखन परीक्षेस एकूण ५७ हजार ५७९ विद्यार्थी बसले आहेत. त्यात ३० श. प्र. मि. परीक्षेस ५५ हजार ८८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तर ४० श. प्र. मि. परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ६९२ आहे. त्यामुळे आॅगस्ट २०१६ च्या परीक्षेच्या तुलनेत जानेवारी- फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते.परीक्षा परिषदेतर्फे २८ डिसेंबर ते ४ जानेवारी २०१७ या कालावधीत संगणकीय टंकलेखन परीक्षेचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले होते. त्यातील पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा राज्यातील १९५ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. त्यात इंग्रजी ३० व ४० श. प्र. मि. परीक्षा २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार आहे, तर मराठी/ हिंदी ३० व ४० श. प्र. मि. परीक्षा ४ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत घेतली जाणार आहे, असेही डेरे यांनी सांगितले.