शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी पालिकेच्या सोलर पॅनलचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST

जेजुरी : जेजुरी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी पालिकेने बसवलेल्या सोलर पॅनलचे उद्घाटन पुरंदर हवेलीचे आ. संजय ...

जेजुरी : जेजुरी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी पालिकेने बसवलेल्या सोलर पॅनलचे उद्घाटन पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप यांच्या हस्ते आज करण्यात आले. जेजुरी पालिकेने संजय जगताप यांच्या प्रयत्नातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास योजनेच्या माध्यमातून सुमारे दहा लक्ष रुपये खर्चून पालिका इमारतीवर वीस किलो वॅट क्षमतेचा ऑन ग्रीड सौर प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना जगताप यांनी या प्रकल्पामुळे जेजुरी पालिकेच्या दैनंदिन विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असून पालिकेची दरमहा ३० ते ३५ हजार रुपयांची बचत होणार असल्याचे सांगितले. चार वर्षांपूर्वी पालिकेत सत्ता आल्यानंतर पालिका वीज महामंडळाची सुमारे साडेतीन कोटींची थकबाकी नफा, फंड व इतर फंडातून भरली होती. यामुळे विकासकामे करण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र त्यावर मात करीत पालिकेने शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. पालिकेचा नित्याचा खर्च म्हणजे वीजबिल असल्याने पालिकेने स्वतःची वीजनिर्मिती करून खर्च भागवण्याचा निर्णय घेऊन हा सौर प्रकल्प राबवला आहे. २६४ सोलर स्ट्रीट लाईटचे खांब बसवण्यात आले आहेत. यामुळे पालिकेचा दरमहा विजेवर होणारा साधारणपणे ३ लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे. पालिकेचे हे एक आत्मनिर्भरतेकडे जाणारे पहिले पाऊल असल्याचेही जगताप यांनी म्हटले आहे. या सौर प्रकल्पाची संपूर्ण माहिती नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी या वेळी दिली. या सौर प्रकल्पातून दररोज ८० युनिट याप्रमाणे महिन्याला २४०० युनिट वीजनिर्मिती होणार आहे. वर्षाकाठी २८५०० युनिटची वीजनिर्मिती होऊ शकणार आहे

या वेळी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, मुख्याधिकारी पूनम कदम, गटनेते सचिन सोनवणे, नगरसेवक बाळासाहेब दरेकर, बाळासाहेब सातभाई, अजिंक्य देशमुख, गणेश शिंदे, नगरसेविका रुक्मिणी जगताप, पौर्णिमा राऊत, शीतल बयास, वृषाली कुंभार, माजी नगरसेवक रमेश बयास, हेमंत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सौर प्रकल्प उद्घाटन करताना आ. संजय जगताप व इतर.