शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बारामतीच्या ‘दादां’चा अकलूजच्या ‘दादां’ना शह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 14:28 IST

अलीकडच्या काही काळात सोलापूरच्या पालकमंत्रिपदी आलेले भरणे हे तिसरे आमदार आहेत.

ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द या नियुक्तीमध्ये मानला जात आहे महत्त्वाचा

सतीश सांगळे - कळस : इंदापूरचे आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केली आहे. अलीकडच्या काही काळात सोलापूरच्या पालकमंत्रिपदी आलेले भरणे हे तिसरे आमदार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अनुक्रमे दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती या पदी झाली होती. मात्र, प्रकृतीच्या काळ्जीस्तव या दोघांनीही माघार घेतली. यामुळे रिक्त झालेल्या या पदावर आता आव्हाड यांच्या जागी भरणे यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द या नियुक्तीमध्ये महत्त्वाचा मानला जात आहे. भरणे यांची नियुक्ती करून बारामतीच्या ‘दादां’नी अकलूजच्या ‘दादां’ना शह दिल्याचे मानले जात आहे.सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. भरणे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने इंदापूर तालुक्यात याचे स्वागत केले. इंदापूर तालुक्याच्या लगतच सोलापूर जिल्हा आहे. तालुक्याच्या तिन्ही बाजूंनी सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यावर प्रदीर्घकाळ एकहाती सत्ता प्रस्थापित केलेले शरद पवार यांचे विश्वासू अकलूज (माळशिरस) येथील विजयसिंह मोहिते पाटील (दादा) यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला अनुकूल भूमिका घेतली. त्यामुळे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पराभव पत्करावा लागला. उपमुख्यमंत्री पवार आणि इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे राजकारणातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. मोहिते पाटील गटाकडून नेहमीच पाटील यांना मदतीची भूमिकाघेण्यात येते.इंदापूर  व माळशिरस (अकलूज) तालुका लागून असल्याने जिल्हा अपवाद वगळता सर्व व्यवहार, व्यावसाय एकत्र आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्याकडून तालुक्यात होणारा शिरकाव उपमुख्यमंत्री पवार यांना अडचणीचा ठरत होता. त्यामुळे कट्टर समर्थक भरणे यांची नियुक्ती करून अजित पवारांनी सोलापुरात वर्चस्व निर्माण केले आहे. मंत्री भरणे अजातशत्रू म्हणून ओळखले जातात.........

..कारखाना संचालक ते पालकमंत्री भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या दत्तात्रय भरणे यांना शेती करत असतानाच कारखान्यात संचालक म्हणून ९१ ला पवार कुटुंबीयांनी संधी दिली. तेथून पुढे कायम भरणे यांचा राजकीय आलेख चढता राहिला. कारखाना संचालक ते अध्यक्ष, जिल्हा बँक संचालक ते अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य ते अध्यक्ष, व आमदार ते राज्यमंत्री, पालकमंत्री, हा राजकीय प्रवास शांत, संयमी भरणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या बळावर संपादन केला आहे...............सोलापूरचे इंदापूर ‘कनेक्शन’ च्सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात तालुक्यातील शेळगाव येथील यशवंत माने राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. आता सोलापूरचे पालकमंत्रिपदही इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSolapurसोलापूरIndapurइंदापूर