शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! "तुमचा मोबाईल चोरीला गेलाय; जरा थांबा...तो परत मिळू शकतो"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 8:32 PM

चोरीला गेलेले ७४ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश; असंख्य मोबाईल परराज्यात कार्यरत 

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या युनिट २ ला यश : १४०० मोबाईलचा शोध सुरु

पुणे : बसस्टॉप, भाजी मंडई अशा गर्दीच्या ठिकाणाहून दररोज असंख्य मोबाईल चोरीला जातात. प्रत्यक्षात हे मोबाईल चोरीला गेलेले असले तरी त्याची नोंद पोलीस गहाळ झाले म्हणून ऑनलाईन तक्रार करायला सांगतात. असे सुमारे १४०० मोबाईलचा शोध घेतला जात असून त्यापैकी ७४ मोबाईल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट २ ला यश आले आहे. त्यातील अनेक मोबाईल पुणे शहरात ॲक्टीव्ह असल्याचे आढळून आले आहे.

पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मिसींग मोबाईलचा शोध घेण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अंमलदार समीर पटेल यांनी परिमंडळ २ मधील सर्व पोलीस ठाण्यातील मिसींग तक्रारींचा आढावा घेतला. त्यांची माहिती प्राप्त करुन तांत्रिक विश्लेषण केले. त्यात १३ लाख ४३ हजार ७०० रुपयांचे महागडे ७४ मोबाईल शोध ध्णयात यश मिळाले.

पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, सहायक निरीक्षक वैशाली मोरे, सहायक फाैजदार यशवंत आंब्रे, अस्लम शेख, चेतन मोरे, चंद्रकात महाजन, उत्तम तारु, निखील जाधव, समीर पटेल, गजानन सोनुने, मितेश चोरमोले, कादीर शेख, गोपाळ मदने, अजित फरांदे, अरुणा शिंदे यांनी ही कामगिरी केली.

चोरीचे मोबाईल परराज्यात विकणारी साखळीपुण्यात चोरीला गेलेले, हरविलेले मोबाईल परराज्यात विकले जात असल्याचे पोलिसांच्या या शोध मोहीमेत आढळून आले. पोलिसांना मिळालेल्या या ७४ मोबाईलपैकी बहुतांश मोबाईल हे पुणे शहरात कार्यरत होते. पोलिसांनी त्यांना विचारल्यावर अनेकांनी ते आपल्याला सापडल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी ते कमी किमंतीत विकत घेतलेले होते. त्यांच्याकडे त्याची कोणतीही पावती नव्हती. तसेच बाहेरगावी ॲक्टीव्ह असलेल्या मोबाईलधारकांनी आम्ही विकत घेतल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी त्यांना गुन्ह्याचा धाक दाखविल्यावर काहींनी ते कुरियर करुन पोलिसांना पाठिवले आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले की, परिमंडळ २ मधील सर्व पोलीस ठाणे आणि जवळच्या परिमंडळ ३ मधील काही पोलीस ठाण्यातील गहाळ मोबाईलचा आढावा घेतला. त्यापैकी महागड्या सुमारे साडेपाचशे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर संबंधितांशी संपर्क करुन ७४ मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहेत. जवळपास ८० मोबाईल हे परराज्यात ॲक्टिव्ह असल्याचे या मोहिमेत आढळून आले आहे.

१४०० मोबाईलचा शोध सुरु

जानेवारी २०२१ पासून परिमंडळ २ मधील ७०० आणि परिमंडळ ३ मधील ७०० अशा सुमारे १४०० गहाळ म्हणून नोंद करण्यात आलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात येत आहे. त्यापैकी सुमारे साडेपाचशे मोबाईल ट्रेसिंगमधून आतापर्यंत ७४ मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे. अन्य मोबाईलचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक

........एखाद्याने तुम्हाला धाक दाखवून खिशातील २०० रुपये काढून घेतले तरी पोलीस त्याची दखल घेतात. पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देतात. गुन्हा दाखल होतो. पण तुमचा २० हजारांचा मोबाईल चोरीला गेला असला तरी पोलीस लॉस्ट ॲन्ड फाऊंडला तक्रार करायला सांगतात. नागरिकांनाही मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे तेच सीमकार्ड मिळण्यासाठी ते ऑनलाईन तक्रार करतात. ऑनलाईन तक्रारीची दखल घेत नसल्याने अशा चोरट्यांचे फावले आहे.

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी