शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाची कागदपत्रे झाली खाक!

By admin | Updated: March 9, 2015 00:43 IST

शनिवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बारामती नगरपालिकेच्या तळमजल्यावरील नगररचना

बारामती : शनिवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत बारामती नगरपालिकेच्या तळमजल्यावरील नगररचना, जागा भाडे, संगणक कक्ष, लेखा विभाग, घरपट्टी, आस्थापना विभागाची महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. अंदाजे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पालिकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाले आहे, असे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले.आग लागल्याचा प्रकार दहा वाजण्याच्या सुमारास शेजारी नवीन प्रशासकीय इमारतीचे काम चाललेल्या कामगारांना लक्षात आला. त्यांनी सुरक्षारक्षकाला याबाबत माहिती दिली. तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. बांधकाम व नगररचना विभागाच्या बाजूने आगीचे लोट खिडकीतून बाहेर येत होते. संगणक कक्षाचे फारसे नुकसान झालेले नाही. त्याचबरोबर जुने ब्रिटिशकालीन रेकॉर्ड, नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असल्यामुळे व्यापार संकुलात स्थलांतरित करण्यात आले आहे. आग विझविण्यासाठी नगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी, एमआयडीसी अग्निशमन विभाग, माळेगाव कारखाना, छत्रपती कारखाना आदी भागातील अग्निशमन बंबाने जवळपास एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर यश आले. महत्त्वाची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली. उर्वरित कागदपत्रे पाण्यामुळे भिजली आहेत. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. आगीचे कारण काय, याबाबत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. आज नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, खातेप्रमुख, मुख्याधिकारी, नगरसेवक आदींच्या उपस्थितीत आगीतून बचावलेली कागदपत्रे बाजूला काढण्यात आली. खातेप्रमुखदेखील या कामासाठी जुंपले होते. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, माजी नगराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगरसेवक किरण गुजर, शाम इंगळे, बापू बागल, सुनील सस्ते, शाकीर बागवान, भाजपाचे अ‍ॅड. नितीन भामे, रासपचे किशोर मासाळ, मनसेचे विनोद जावळे, माजी नगराध्यक्षा मंगल शहा सराफ यांच्यासह आजी माजी नगरसेवक, मुख्याधिकारी झिंजाड, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, महावितरणचे परिमंडल कार्यकारी अभियंता इरवाडकर, उपअभियंता देवकाते, मोकाशी, पोलीस कर्मचारी, अधिकारी, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, खातेप्रमुख आदींनी आग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यामुळे अधिकचे नुकसान टळले. नगरपालिकेच्या आवारातील वाहनांमुळे आग विझविण्यात अडथळे आले. अग्निशमन बंब आत आणण्यात अडचणी आल्या. त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जळाली. (प्रतिनिधी)