शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जखमा सुगंधी करणारे इलाही, वेदना अनाथ करून गेले...पुण्यातील येरवड्यात अनेक वर्षांपासून वास्तव; तब्येत ठिक नसल्याने गेले होते मूळगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST

आता त्यांची लेखणी थांबली असून, गझला पोरक्या अन‌् अनाथ झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे ते पुण्यात येरवड्यात राहत होते. ...

आता त्यांची लेखणी थांबली असून, गझला पोरक्या अन‌् अनाथ झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे ते पुण्यात येरवड्यात राहत होते. पण ‘पुण्यात काय माणसं राहतात का ? ? ? ? ?’ असा सवाल ते भेटायला येणाऱ्यांना करायचे ? कारण माणसांचा ओलावा त्यांना कमीच जाणवला. तब्येत बरी नसल्याने काही दिवसांपुर्वीच ते आपल्या मूळगावी दूधगाव (ता. मिरज) येथे गेले होते.

इलाही येरवड्यातील एका छोट्याशा खोलीत एकटे राहत होते. त्यांनी त्यांच्या वेदनांना आपल्या लेखणीद्वारे वाट करून दिली होती. गेली ५४-५५ वर्षे ते गझला, दोहे, कविता लिहित होते अन‌् साहित्याला समृध्द करत होते. त्यांच्या ‘जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला...’ ही गझल भीमराव पांचाळे यांनी गायली आणि त्यांना सर्वांपर्यंत पोचविले. इलाही स्वत:ही ते मान्य करायचे की, भीमराव यांच्यामुळे त्यांची गझल तळागाळापर्यंत गेली. गेली काही वर्षे इलाही खोलीत एकटे राहत असताना त्यांना सहसा खूप लोकं भेटायला येत नसत. पण त्यांनी त्यांचे आयुष्य साहित्यासाठी वाहिले होते. सकाळी आळंदी रस्त्यावर ते फिरायला जायचे. निसर्ग हाच नवनवीन कविता, गझल लिहिण्यासाठी प्रेरणा देतो, असे ते म्हणायचे. संगम ब्रिज येथे अनेक वर्षांपुर्वी ते सायकलीवर जात असताना, पुलाच्या मध्ये पिंपळ उगवला होता. तेथून त्यांना हवेची थंडगार झुळूक आली आणि त्यावर त्यांनी गझल लिहिली. ‘प्रतिकुल स्थिती असताना जोमात वाढतो आहे, पिंपळापरी या रूजणे, जमेल का ते बघतो आहे’ ही त्यांची गझल अतिशय सुंदर आहे.

शेवटी ते एकटेच राहताना, ते स्वत:ची समाधी लागल्याचे बोलायचे. मला आता समाधी मिळाली आहे आणि त्यामुळे माझं लेखन समृध्द झालं असल्याची भावना ते व्यक्त करायचे. पुण्यात गझलांचा कोहिनूर होता, पण तो इथं अधिक चमकलाच नाही. पण दर्दी रसिकांच्या मनाचे ते कायम ‘कोहिनूर’चे होते आणि राहतील. त्यांच्या जाण्याने गझल अन‌् वेदना खरोखर अनाथ झाल्याची भावना रसिकांमध्ये आहे.

====================

फेसबुकवर सतत द्यायचे ‘अपडेट’

फेसबुकवर इलाही यांचे खाते होते. त्यावर ते सतत अपडेट देत असत. कालच त्यांनी ‘जखमा अशा सुगंधी...’ या पुस्तकाचे कव्हर पोस्ट केले होते. अनेक तरुण त्यांना भेटत असत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने या तरुणाईने आपल्या भावना फेसबुकवर व्यक्त केल्या.

====================