शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘सीरम’मधील अनर्थ टळला असता; ‘व्हेंटिलेशन’ची सोय नसल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 06:46 IST

आग लागल्याचे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३३ मिनिटांनी कळविण्यात आले. तर, पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३५ मिनिटांनी ही माहिती समजली.

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीची घटना वेळेत अग्निशामक दलाला कळविण्यात आली असती, तर कदाचित पुढील अनर्थ टाळता आला असता. ही घटना कळविण्यात उशीर झाला असण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.आग लागल्याचे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३३ मिनिटांनी कळविण्यात आले. तर, पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३५ मिनिटांनी ही माहिती समजली. दोन्ही दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत उत्तम दर्जाची ‘फायर फायटिंग सिस्टीम’ आहे. आग लागली तेव्हा ही सिस्टीम सुरूही झाली होती. परंतु, आगीचे प्रमाण अधिक असल्याने आग या सिस्टीमद्वारे आटोक्यात आणणे अवघड झाले असावे. याच सिस्टीममधील पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, आग लागल्यानंतर आठच मिनिटांत अग्निशामक दलाला कळविल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहेघातपात की अपघात? आत्ता भाष्य नकोच : मुख्यमंत्रीही आग म्हणजे अपघात होता, की घातपात यावर आत्ता भाष्य नको. तपास पूर्ण होऊ द्या, अहवाल येऊ द्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत शुक्रवारी ‘सीरम’ला भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढायला नको. मृत्यू झालेल्यांची संपूर्ण जबाबदारी ‘सीरम’ने घेतली आहे. आवश्यकता पडल्यास सरकारही मदत करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.स्फोट कशाचे झाले?आग लागल्यानंतर स्फोटाचे आवाज आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, स्फोट नेमके कशाचे झाले हेच समजत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगPuneपुणेCorona vaccineकोरोनाची लस