शिरूरमध्ये कोणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला; डिंगडाँग केलं तर त्याला सोडणार नाही - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 20:45 IST2025-11-28T20:44:58+5:302025-11-28T20:45:17+5:30
कुणी कोणत्याही मोठ्या बापाचा असो सर्वांचा न्याय संविधानच्या पद्धतीने समान असेल, यात कसलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. मी दहशत खपवून घेणार नाही

शिरूरमध्ये कोणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला; डिंगडाँग केलं तर त्याला सोडणार नाही - अजित पवार
शिरूर : शिरूर एमआयडीसी मधून खूप तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत. तुमच्या भागात येऊन पालकमंत्री म्हणून सांगत आहे. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची आता. शिरूरमध्ये कोणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला. कोणी डिंगडाँग केलं तर त्याला सोडणार नाही. कुणी कोणत्याही मोठ्या बापाचा असो सर्वांचा न्याय संविधानच्या पद्धतीने समान. यात कसलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. मी दहशत खपवून घेणार नाही. असा सज्जड दम उपमुखमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
शिरूर येथे नगरपरिषद निवडणुकी निमित्त झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळरावं पाटील, मजी आमदार राहुल जगताप, आ. ज्ञानेशवर कटके, माजी आमदार पोपटराव गावडे, दादापाटील फराटे, रवी काळे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, शासनाने उदयोगांना चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता उद्योग व बांधकामासाठी जमीन बिगर शेती (एनए) करण्याची गरज लागणार नाही. फक्त सबंधित स्थानिक आस्थापनांची परवानगी चालणार आहे. सध्या पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा मोठा प्रश्न आहे. त्याच्या प्रभावी उपाययोजनेच्या साठी रेस्कु टीम आणि जी अत्याआधुनिक उपकरणे वापरावी लागणार आहेत. त्यासाठी 11 कोटी 25 लाखाचा निधी दिला आहे. मानव-बिबट संघर्षावर काम सुरू आहे,नागरिकांना सूचना आहेत त्यांनी भयभीत होऊ नये.
आतापर्यंत मी शिरूर नगरपरिषद निवडणुकीत कधीच हस्तक्षेप केला नाही. काही बगल बच्चे अजित पवार जास्त जागा मागत आहे. म्हणून धरिवाल यांनी माघार घेतली असे सांगतात. अरे काय माझ्या घरच्या जागा आहेत का,थापा कशाला सांगता, प्रकाश धारिवाल यांनी सांगितले माझा व्यवसायात लक्ष देणार आहे. तीन वेळा विचारून ते नाही म्हटले तेव्हाच पॅनल टाकला.आता शिरूर शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही.
घोडगंगाचा प्रश्न विचारताच पवार संतापले
अजित पवार बोलत असताना एका शेतकऱ्याने दादा घोडगंगा कारखान्याचे बोला असे म्हणताच पवार संतापले ''याला लय घाई झाली याला आत घ्या रे स्वछता गृहात". असे संतप्त होत आधी शहर मग कारखान्याचे बोलतो असे म्हणत कर्ज मंजूर केले आहे. तुला पाहायच असेल तर मुबंईला ये मंत्रालयात असे पवार म्हणाले.