शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास आघाडीची ताकद वाढेल; जयंत पाटीलही एकत्र येण्याला सकारात्मक

By अतुल चिंचली | Updated: June 9, 2025 13:06 IST

राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्याने आमची ताकद वाढेल, पण शिवसेनेने मनसेला घ्यायचे की नाही ते ठरवावे

पुणे : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठा आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले आहे. परंतु याबाबत दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. परंतु, राज ठाकरेंनी एका मुलाखतीत युतीसंदर्भात सुचक वक्तव्य केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावरून आघाडीच्या नेत्यांकडून भाष्य केले जात आहे.

खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रासाठी दोघे एकत्र आल्यास उत्तमच राहणार असल्याचे सांगितले आहे. आता याबाबत जयंत पाटलांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. राज ठाकरे महाविकस आघाडीत आल्यावर आघाडीची ताकद वाढेल असं त्यांनी सांगितले आहे. तर दोन्ही एन सी पी एकत्रित येणार यावर कुठलीही चर्चा नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. 

जयंत पाटील म्हणाले, ठाकरे यांना पण एकत्रित आणण्याचे काम माध्यमे करत आहेत. शिवसेनेने मनसेला घ्यायचे की नाही ते ठरवावे. राज ठाकरे चांगले प्रभावी वक्ते आहेत. असे म्हणत जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्याने आमची ताकद वाढत असेल. तर राज ठाकरे यांना घेण्यात काय गैर नाही असं पाटील यावेळी म्हणाले आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडी मनसेशी युती करण्यास सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. परंतु अजूनही मनसेकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. राज ठाकरेंनी सुद्धा मनसे पदाधिकाऱ्यांची झालेल्या बैठकीत युतीवर भाष्य न करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीच्या आक्षेपाबाबत बोलताना पाटील म्हणाले, निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या बाबतीत काही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. याला निवडणूक उत्तर देणे योग्य आहे. भाजपचे नेते काही वक्तव्य केले आहे. त्यांनी वक्तव्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.  

टॅग्स :PuneपुणेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना