शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लॉकडाऊन झाल्यास अर्थचक्र होईल उद‌्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:17 IST

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाला अटकाव करण्याकरिता काळजी घेणे आणि खबरदारी बाळगणे आवश्यकच आहे. मात्र, ...

पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाला अटकाव करण्याकरिता काळजी घेणे आणि खबरदारी बाळगणे आवश्यकच आहे. मात्र, कोरोना रोखण्याकरिता ‘लॉकडाऊन’ हा उपाय ठरु शकत नाही. पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्यास ‘अर्थचक्र’ उद‌्ध्वस्त होईल. तसेच रोजगाराचा प्रश्नही भीषण रुप धारण करेल. त्यामुळे नागरिक आणि व्यापारी दोघांनीही नियमांचे पालन करणे आणि एकमेकांना सुरक्षित ठेवणे हाच उपाय असल्याचे मत विविध व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.

राज्यामध्येच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यातही रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. रविवारी तर कोरोना रुग्णांचा आकडा ६३४ वर गेला होता. रविवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन कडक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, रात्री ११ ते पहाटे सहा संचारबंदी, शाळा-महाविद्यालये-खासगी क्लासेस आठ दिवसांकरिता बंद, हॉटेलच्या वेळा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाऊन लागल्यास सर्वाधिक फटका हा उद्योग विश्वाला बसणार आहे. बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा सर्व बंद झाल्यास फार मोठा फटका बसू शकतो. लोकांना मिळत असलेला रोजगार बंद होईल. त्यामुळे व्यापारी महासंघाने व्यापा-यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

====

कोरोनाला रोखायचे असल्यास खबरदारी हाच एकमेव उपाय आहे. मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर असे नियम पाळल्यास रुग्णसंख्या कमी होऊ शकते. लॉकडाऊन कोणालाही परवडणारे नाही. आम्ही एक आॅडीओ क्लिप तयार करुन ती सर्व व्यापा-यांना पाठविली आहे. काळजी घ्या, अन्यथा पुन्हा सर्व बंद होईल, असेही नमूद केले आहे.

- महेंद्र पितळीया, सचिव, पुणे व्यापारी महासंघ

====

योग्य खबरदारी घेत व्यवहार सुरु ठेवायला हवेत. व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांना शासनाला कर भरावे लागत आहेत. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. शासकीय यंत्रणांनाही कामांसाठी उत्पन्न लागतेच. लॉकडाऊन लागल्यास पुन्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही. उद्योग-धंदे, आॅफिस-हॉटेल्स सुरु राहावेत. मात्र, सर्व निकषांचे काटेकोर पालन होणे गरजेचेच आहे.

- किशोर सरपोतदार, सचिव, पुणे हॉटेलियर्स असोसिएशन

--------

कोरोनाची आकडेवारी

कोरोनाचे एकूण रुग्ण - १, ९८, २९२

बरे झालेले एकूण रुग्ण - १, ९०, ५६०

एकूण मृत्यू - ४, ८३०

एकूण चाचण्या - ११, ०३, ५४८

--------

अशी वाढली आठवड्यातील संख्या

दिनांक रुग्ण मृत्यू

१५ फेब्रुवारी १९३ ०२

१६ फेब्रुवारी ३०९ ०१

१७ फेब्रुवारी ४२८ ०४

१८ फेब्रुवारी ४६५ ०६

१९ फेब्रुवारी ५२७ ०४

२० फेब्रुवारी ४१४ ०५

२१ फेब्रुवारी ६३४ ०५

२२ फेब्रुवारी ३२८ ०४