"मी प्रपोज केला पण.." ; तरुणाच्या भन्नाट प्रश्नावर पुणे पोलीस आयुक्तांचे 'खास' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 05:52 PM2021-03-08T17:52:54+5:302021-03-08T17:53:39+5:30

सर..मला आवडणारी मुलगी कालच बालाजीनगरला राहायला आली आहे. मी तिला प्रपोजही केले...

"I proposed but ..." Pune Police Commissioner's 'special' answer to the youth's question | "मी प्रपोज केला पण.." ; तरुणाच्या भन्नाट प्रश्नावर पुणे पोलीस आयुक्तांचे 'खास' उत्तर

"मी प्रपोज केला पण.." ; तरुणाच्या भन्नाट प्रश्नावर पुणे पोलीस आयुक्तांचे 'खास' उत्तर

Next

पुणे: सर..मला आवडणारी मुलगी कालच बालाजीनगरला राहायला आली आहे. मी तिला प्रपोजही केले. परंतु, ते नाकारून तिने आपण फक्त मित्रच आहोत असे सांगितले. प्लिज सर..तुम्ही काहीतरी करून द्या, असा प्रश्न थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना ट्विटरवर विचारला. अन् त्या तरुणाला पोलीस आयुक्तांनी जे उत्तर दिलं ते अफलातून होते. 

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवरून पुणेकरांशी सोमवारी( दि. ८) संवाद साधला. यावेळी वाहतूक, मास्क, पोलिसांची वागणूक, महिला सुरक्षा, नियम याबाबत नागरिकांनी प्रश्न विचारलेल्या प्रश्नांवर गुप्ता यांनी दिलखुलास उत्तरे दिली.याचवेळी लोकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलही प्रश्न त्यांना विचारले. पण त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सामान्य माणसासारखी उत्तरे दिली. 

एका तरुणाने पुणे पोलिस आयुक्तांना थेट त्याच्या प्रेमातील अडचण सांगत त्यातून काहीतरी मार्ग काढून द्या असे सुचवले. आयुक्तांनी पण त्याला आपल्या खास शैलीत उत्तर देत आधारही दिला आणि मार्गदर्शन केले.

तरुणाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त गुप्ता म्हणाले, त्या मुलीची इच्छा नसेल तर तू काहीच करू नकोस. आम्हीही काही करणार नाही. पण आमच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबतच आहे. 

मास्क आणि हेल्मेटबाबत नागरिकांचे अनेक प्रश्न 
आता कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आम्ही मास्क घालू का, चारचाकी मध्ये अनिवार्य आहे का, अजून किती दिवस मास्क घालावे लागेल. असे अनेक प्रश्न नागरिकांनी विचारले. यावर उत्तर देताना अमिताभ गुप्ता म्हणाले, आम्ही सर्व पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठीच असतो. सद्यस्थितीत नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणे फारच महत्वाचे आहे. मास्क घातल्याने तुम्ही कोरोना आजारापासून दूर राहू शकता. दंड आकारण्यापेक्षा तुमची आरोग्य आणि सुरक्षा माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. तरुण हे भारताचे भविष्य आहेत. त्यांनी तर मास्क घालणे अनिवार्य आहे. तरुणांकडून नियमांचे पालन होत नसेल. तर ती अत्यंत निराशाजनक बाब आहे. 
हेल्मेटसक्ती नसूनही हेल्मेट घालणे योग्य आहे का असे नागरिकांनी विचारल्यावर आयुक्त म्हणाले, 
हेल्मेटची निवड सुरक्षेसाठी करा. त्याची आवड म्हणून करू नका. 

शाळा, महाविद्यालयात गुन्हेगारी वाढत आहे याबाबत बोलताना आयुक्त म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी वाढण्याची जबाबदारी सोशल मीडिया आणि आजूबाजूचे वातावरणच कारणीभूत आहे. त्यासाठी आई वडिलांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. 

स्त्रियांना सुरक्षेसाठी पोलीस नेहमीच सतर्क राहणार आहेत. त्यांना रात्री - अपरात्री कधीही मदत लागल्यास पोलीस स्त्रियांना पहिले प्राधान्य देतील. त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. 
 

Web Title: "I proposed but ..." Pune Police Commissioner's 'special' answer to the youth's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.