शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
3
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
4
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
5
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
6
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
7
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
8
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
9
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
10
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
11
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
12
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
13
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
14
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
15
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
16
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
17
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
18
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारच्या तोकड्या रकमेचा उपयोग शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:01 IST

शेतकऱ्याच्या दुःखात राष्ट्रवादी सहभागी असून राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे

बारामती: मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, अशी खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली. पवार हे विविध कार्यक्रमानिमित्त गुरुवार(दि १६) पासून बारामतीत आहेत. शुक्रवारी बारामतीत गोविंदबाग निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नात मला यामध्ये राजकारण आणायचे नाही. पण पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करणेे आवश्यक आहे. याबाबत आम्ही तशी तयारी राज्य सरकारकडे दाखवली. पण शेतकरी आणि पूरग्रस्तांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची तयारी आतापर्यंत तरी दिसून आलेली नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.

राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सगळ्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बसून एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे आजची दिवाळी दिवस साजरी करायची नाही. गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, काही ठिकाणी पुरग्रस्त परिस्थिती होती. यामध्ये शेती, शेतजमीनी उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांचे सर्वस्व असणारी शेतजमीन वाहून गेल्याने कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार? म्हणून त्याच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभाग घ्यायचा निर्णय घेतला. राज्याची देशाची सत्ता असणाऱ्यांनी लोकांना संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी असते. नुकसानीच स्वरूप बघितल्यास राज्य सरकारने जाहिर केलेल्या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त शेतकरी नाराज आहे. मी एवढं सांगू इच्छितो की, हे जे काही घडतंय ते दुःखद आहे, त्याबाबत मला अधिक भाष्य करायचे नाही, असे पवार यांनी म्हटले.

पुरंदर विमानतळाबाबत शरद पवार म्हणाले, मोबदला हा विषय नाही. काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, विमानतळाची जागा बदला. हा निर्णय मी किंवा सरकारी अधिकारी घेऊ शकत नाहीत. हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. विमानतळ कुठे काढायचं हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल. प्रश्न असा आहे जिथे विमानतळ बांधण्यात येईल, तेथील शेतकऱ्यांची शेती ताब्यात घेतली जाईल. अशा सर्वांचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाई कशी दिली जाईल याबाबत शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. चर्चेत मी एवढंच सांगितलं कोणीही गैर कायद्याने शेतकऱ्यांची जमीन काढू शकत नाही. त्यांना योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन द्याव्यात ही त्यांची मागणी होती. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांची भेट घेवून यातून काहीतरी मार्ग काढा, अशी विनंती करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Inadequate state funds won't help farmers recover: Sharad Pawar

Web Summary : Sharad Pawar criticizes the state government's insufficient aid for flood-affected farmers. He highlights farmer distress, leading to a 'black Diwali' protest. Pawar will discuss farmer compensation and land issues with the Chief Minister regarding the Purandar airport project.
टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीMahayutiमहायुती