पुणे विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉक येथून आलेले दोघे ताब्यात

By नितीश गोवंडे | Updated: May 14, 2025 20:53 IST2025-05-14T20:52:23+5:302025-05-14T20:53:00+5:30

या कारवाईत १० किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १० कोटी आहे

Hydroponic marijuana worth Rs 10 crore seized at Pune International Airport Two people from Bangkok arrested | पुणे विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉक येथून आलेले दोघे ताब्यात

पुणे विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉक येथून आलेले दोघे ताब्यात

पुणे: महसूल गुप्तचर विभागाकडून (रेव्हेन्यू इंटेलिजन्स डिपार्टमेंट) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दहा कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी बँकॉक येथून आलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार ‘डीआरआय’च्या पथकाकडून मुंबईतून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

बँकाॅकहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (दि.१२) दोनजण उतरले. त्यांच्याकडे हायड्रोपोनिक गांजा असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी विमानतळावर दोघांची चौकशी केली. त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीत हायड्रोपोनिक गांजा सापडला. चौकशीत मुंबईतील एकाकडे हायड्रोपोनिक गांजा विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती दोघांनी दिली. ‘डीआरआय’च्या पथकाने मुंबईतून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनदेखील गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत दहा किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत दहा कोटी रुपये असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून, यापूर्वी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केंद्रीय सीमा शुल्क (कस्टम), तसेच डीआरआयच्या पथकाने तस्करी करुन आणलेले अमली पदार्थ, तसेच सोने जप्त केले आहे. हायड्रोपोनिक गांजा रासायनिक प्रक्रिया करून तयार केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत जास्त आहे.

Web Title: Hydroponic marijuana worth Rs 10 crore seized at Pune International Airport Two people from Bangkok arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.