शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पोटगीची रक्कम थकवली म्हणून पतीला तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 1:30 AM

पत्नीच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन घटस्फोट घेऊन त्याने दुसरे लग्न केले.

पुणे : पत्नी आणि दोन मुलींना द्यायची एक लाख ६६ हजार रुपयांची पोटगी थकविल्याच्या प्रकरणात न्यायालयाने पतीला सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला. दशरथ हनुमंत मळेकर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख ६६ हजार रुपये पोटगीची रक्कम येणे बाकी आहे. पोटगी रक्कम थकविल्यामुळे त्याच्याविरुद्ध वॉरंट काढण्यात आले होते. त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.

पत्नीच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन घटस्फोट घेऊन त्याने दुसरे लग्न केले. पहिली पत्नी आणि दोन मुलींना १३ हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर यांनी दिला होता. मात्र, त्याने आदेशाचे पालन केले नाही. त्याच्याकडून पैसे भरण्यातआले नाहीत म्हणून वॉरंट काढण्यात आले होते. अर्जदार महिलेतर्फे अ‍ॅड. मनीषा गोळे-माने यांनी पाठपुरावा केला. पोटगीची रक्कम द्यावी लागेल; म्हणून तो सतत घरे बदलत होता. त्याच्या राहत्या घराचा पत्ता न्यायालयात दाखल करेपर्यंत त्याने घर बदलेले असायचे.पोटगीची रक्कम न भरल्यामुळे त्याच्याविरुद्ध वॉरंट काढण्यात आले होते. त्याला पकडण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार फडतरे यांनी साह्य केले, अशी माहिती अ‍ॅड. माने यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय