देवदर्शनासाठी गेलेल्या पती- पत्नीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मंगळसूत्र हिसकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 18:35 IST2021-11-21T18:34:47+5:302021-11-21T18:35:54+5:30
घोरावडेश्वर डोंगरावरील मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या पतीला बाजूला ढकलून पत्नीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून चोरट्याने मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.

देवदर्शनासाठी गेलेल्या पती- पत्नीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मंगळसूत्र हिसकावले
पिंपरी : घोरावडेश्वर डोंगरावरील मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या पतीला बाजूला ढकलून पत्नीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून चोरट्याने मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडली. श्रीकृष्ण गंगाधर दराडे (वय २९, रा. कासा इपारिया अपार्टमेंट, वाकडकर वस्ती, वाकड) यांनी तळेगाव- दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दराडे हे त्यांच्या पत्नीला घोरावडेश्वर मंदिर दाखविण्यासाठी शनिवारी सायंकाळी जात होते. मात्र, अंधार होईल म्हणून मधून परत खाली उतरत असताना पायथ्याच्या मध्यभागी एकाने फिर्यादी दराडे यांना बाजूला ढकलून त्यांच्या आणि पत्नीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले.