HSC/12th Exam: बारावीत भाषेच्या पेपरमध्ये काॅपीच्या ३६ घटना उघड; पुणे विभागामध्ये ८, अमरावती २१ आणि नागपूर विभागात १
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:33 IST2026-02-13T09:32:40+5:302026-02-13T09:33:27+5:30
HSC/12th Exam छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर आणि कोकण विभागात एकही प्रकार सापडला नाही

HSC/12th Exam: बारावीत भाषेच्या पेपरमध्ये काॅपीच्या ३६ घटना उघड; पुणे विभागामध्ये ८, अमरावती २१ आणि नागपूर विभागात १
पुणे : राज्यात इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असून, सलग तिसऱ्या दिवशीही काॅपी केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. सकाळच्या सत्रात मराठी आणि इतर ८ भाषा विषयाची परीक्षा घेण्यात आली. यात राज्यामध्ये एकूण ३० काॅपी प्रकार घडले आहे. दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश, पाली भाषेची परीक्षा झाली. यात एकूण ६ प्रकरणे उघड झाली आहेत.
पहिल्या सत्रात पुणे विभागामध्ये ०८, अमरावती २१ आणि नागपूर विभागात १ प्रकार समाेर आला असून, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर आणि कोकण विभागात एकही प्रकार सापडला नाही. दुपारच्या सत्रातील परीक्षेत अमरावती विभागात काॅपीचे ६ प्रकार उघड झाले आहेत. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर आणि कोकण विभागात एकही प्रकार आढळून आलेला नाही, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
पहिल्याच दिवशी अर्थात मंगळवारी (दि. १०) राज्यात काॅपीची ४२ प्रकरणे आढळून आली हाेती. दुसऱ्या दिवशीही चार प्रकरणे उघड झाली आहेत पहिला पेपर इंग्रजीचा, तर दुसरा पेपर हिंदीचा हाेता. गुरुवारी भाषेचा पेपर झाला. विद्यार्थ्यांना काॅपीमुक्त आणि तणावमुक्त पेपर देता यावा म्हणून राज्य दक्षता समिती, जिल्हा दक्षता समितीने आवश्यक उपाययाेजना केल्या आहेत.