शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Video: महाराष्ट्राचे ‘कोरोना योद्धे’ कसे लढले? कर्तव्यासोबत माणुसकीची कथा सांगणारा माहितीपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 14:09 IST

पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांची मुलाखत.

- विवेक भुसेलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगात पोलीस नेहमीच धावून जातात. पण लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी, उपासमार याबरोबरच बंदोबस्त अशा तीन आघाड्यांवर तेही इतका दीर्घकाळ लढण्याची वेळ महाराष्ट्रपोलिसांवर प्रथमच आली. यात अनेक पोलीस बांधव शहीद झाले. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कामाचे सर्वांनी कौतुक केले. हे काम कायमस्वरुपी जतन व्हावे, या हेतूने महाराष्ट्र पोलीस कोरोना योद्धा हा माहितीपट बनविल्याचे पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांनी सांगितले. महाराष्ट्र गुप्तचर अ‍ॅकेडमीमध्ये असलेल्या सरतापे यांच्याशी साधलेला संवाद.

अशी फिल्म तयार करावी, असे नेमके आपल्याला का वाटले?पुणे पोलीस दलातील वाहतूक शाखेत असताना ‘गिव्ह वे टु अ‍ॅम्बुलन्स’ अ‍ॅम्बुलन्सला रस्ता द्या, हा छोटासा अडीच मिनिटाचा व्हिडिओ बनविला होता. तो फेसबुकमार्फत तब्बल साडेचार कोटी लोकांनी पाहिला, इतरांना शेअर केला. त्यानंतर ‘यमराज पुण्यात’, अपघातग्रस्तांना मदत करावी, यासाठी ‘हेल्पिंग हँड’ या शॉर्ट फिल्म बनविल्या. त्या चांगल्याच नावाजल्या गेल्या. राज्यातील सर्व पोलीस दलाने या काळात चांगले काम केले. मात्र, काळाबरोबर ते पुसले जाऊ नये. राज्यभरातील पोलिसांच्या कामगिरी एकत्रितपणे दिसावी यासाठी हा प्रयत्न केला.

त्यासाठी काय करावे लागले?संपूर्ण राज्यातील पोलीस दलातून त्यांनी केलेले व्हिडिओ मागविले. साधारण ५० तासांचे हे व्हिडिओ, फोटो आमच्याकडे आले होते. त्यात पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न करुन एक संहिता तयार केली. त्यातून सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात पोलिसांचे कौतुक तर आहेच, आजवर पोलिसांना एकाचवेळी इतकी कामे तीही माणुसकीच्या नात्याने करण्याची वेळ आली नव्हती. तो माणुसकीचा ओलावा जपण्याचा प्रयत्न आम्ही या माहितीपटात केला आहे. पोलिसांनी कायदा राबविता विनाकारण फिरणाऱ्यांना जशी शिक्षा दिली. तसेच गरजू, अडलेल्या, उपासमार सहन करत असलेल्या लोकांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन मदत केली. पोलिसांची विविध रुपे या माहितीपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

या माहितीपटासाठी संपूर्ण राज्यभरातील पोलीस, वृत्तपत्र व त्यांच्या वेबसाईट, वृत्तवाहिन्या यांची मदत झाली. माहितीपटाचे लेखन, दिग्दर्शन, निवेदन मी केले असले तरी मला कॅमेरामन नागेश नित्रुडकर, सहायक दिग्दर्शन अक्षय, संकलन शोएब शेख, साऊंड केदार आठवले, एके स्टुडिओ, बिंक स्टुडिओ, सागर वंजारी या सर्वांनी कोणताही मोबदला न घेता हे काम केले. त्यामुळेच ३० मिनिटांचा हा माहितीपट आज तयार होऊ शकला.या माहितीपटाद्वारे पोलिसांचे काम सर्वसामान्यांबरोबरच जगभरातील लोकांपर्यंत पोहचविण्याचा हा एक प्रयत्न आहे. तो युट्युबवर उपलब्ध आहे.-

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस