शहरात दुपारी कडक ऊन; रात्री मात्र गारवा, राज्यात पुण्यात कमी तापमानाची नोंद

By श्रीकिशन काळे | Published: March 15, 2024 06:33 PM2024-03-15T18:33:52+5:302024-03-15T18:35:54+5:30

हवामानातील बदलाने पुणेकर हैराण, अनेकांना आजारांची लक्षणे

Hot sun in the city in the afternoon But cool at night low temperature recorded in Pune in the state | शहरात दुपारी कडक ऊन; रात्री मात्र गारवा, राज्यात पुण्यात कमी तापमानाची नोंद

शहरात दुपारी कडक ऊन; रात्री मात्र गारवा, राज्यात पुण्यात कमी तापमानाची नोंद

पुणे : यंदा हवामान बदलल्याचे प्रकर्षाने पुणेकरांना जाणवत आहे. कारण मार्च महिना अर्धा संपला तरी देखील सकाळी आणि रात्री हवेत गारवा अनुभवायला येत आहे. शनिवारी पहाटे तर किमान तापमान १४.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आणि त्यामुळे पुणेकरांना गारव्याची अनुभूती मिळाली. दुपारी मात्र कडक उन्हाच्या झळ्या पुणेकरांना लागत आहेत.

दरवर्षी मार्च महिना आला की, उष्णतेमुळे पुणेकर हैराण होत असतात. परंतु, यंदा मात्र हवेचा नूर काही औरच आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वात कमी किमान तापमान पुण्यातच नोंदवले जात आहे. शुक्रवारी किमान तापमान १४.९ होते तर आज ते कमी होऊन १४.१ नोंदले गेले. त्यामुळे मार्च महिन्यात किमान तापमानात वाढ  व्हायच्या ऐवजी ते खालीच येत असल्याचे दिसून येत आहे. एनडीए आणि हवेलीमध्ये तर पारा १३.३ अंशावर होता. दुसरीकडे वडगावशेरी, मगरपट्टा, कोरेगाव पार्क हे मात्र हॉट झाल्याचे पहायला मिळत आहेत. या ठिकाणचे किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे.

शहरातील किमान तापमान

हवेली : १३.२
एनडीए : १३.३
शिवाजीनगर : १४.१
हडपसर : १८.८
कोरेगाव पार्क : २०.०
मगरपट्टा : २१.३
वडगावशेरी २२.३

Web Title: Hot sun in the city in the afternoon But cool at night low temperature recorded in Pune in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.