शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरमधील हुडकोची घरे मालकांच्या नावावर होणार

By admin | Updated: July 21, 2014 04:03 IST

येथील हुडको वसाहतीतील नागरिकांचा घरे नावावर होण्याबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, १९८९च्या शासकीय दरानुसार प्रत्येकी १५ हजार रुपये शासनाकडे जमा केल्यावर हुडकोवासीयांच्या नावे घरे

शिरूर : येथील हुडको वसाहतीतील नागरिकांचा घरे नावावर होण्याबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, १९८९च्या शासकीय दरानुसार प्रत्येकी १५ हजार रुपये शासनाकडे जमा केल्यावर हुडकोवासीयांच्या नावे घरे होणार आहेत. १९८९मध्ये हुडको वसाहत निर्माण झाली. या घरांचे हप्ते २००५मध्ये संपले. यानंतर संबंधितांच्या नावे ही घरे होणे अपेक्षित होते. मात्र, हा विषय काही कारणास्तव प्रलंबित राहिला. या घरांचे हप्ते फिटल्याचा ना हरकत दाखला नगर परिषदेला २००९मध्ये मिळाला. दरम्यान २००७ पासून प्रशासकीय क्लिष्ट पद्धतीचा यात फटका बसला. रसिकलाल धारिवाल यांनी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर त्यांनी संबंधित मंत्रालय व प्रशासकीय विभागाशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. मुद्रांक जिल्हाधिकारी राजपूत यांची मागच्या पंधरवड्यात भेट घेतल्यानंतर त्यांनी यात त्वरित लक्ष घालून हुडकोसाठी १९८९मध्ये जागेचा अग्रीम ताबा घेतला. मात्र, त्या जागेची रक्कम भरण्याचे बाकी असल्याचे आमदारांना सांगितले व ३७१ घरमालकांना प्रत्येकी किती रक्कम भरावयास लागेल, याबाबत अडकलेली प्रक्रिया त्यांनी पुढे नेली. दरम्यान, नगर परिषदेत काल रात्री हुडकोवासीयांची सभा घेण्यात आली. शासनाने जी रक्कम भरावयास सांगितली आहे, ती १९८९च्या शासकीय दरानुसार असल्याने सर्वांनी लवकरात लवकर ही रक्कम भरावी, असे आवाहन धारिवाल यांनी केले. या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावलेले नगरसेवक विजय दुगड यांनी या प्रश्नाचा आढावा सादर केला. नगराध्यक्षा सुवर्णा लटांबळे, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे, माजी नगराध्यक्ष रवींंद्र ढोबळे, नगरसेवक जाकिरखान पठाण, महेंद्र मल्लाव, दादाभाऊ वाखारे, प्रवीण दसगुडे, आबीद शेख, संतोष भंडारी, नगरसेविका सुवर्णा लोळगे, मनीषा गावडे, कविता वाटमारे, संगीता शेजवळ, शैला साळवे, सुनीता कालेवार, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, बाजारसमितीचे संचालक राजेंद्र गावडे, माजी नगरसेवक नीलेश लटांबळे, सुनील बाफणा, मुजफ्फर कुरेशी, रामलिंग ट्रस्टचे खजिनदार भाऊसाहेब खेडकर आदी या वेळी उपस्थित होते.(वार्ताहर)