त्याची बायको 'त्या' ॲक्ट्रेससारखी दिसते, आज आली की नाही चालायला? सोसायटीतील लोकांना मेल पाठवून बदनामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 10:30 IST2023-08-17T10:30:05+5:302023-08-17T10:30:24+5:30

महिलेच्या पतीस धक्काबुक्की करून ‘तुला पोलिसांत जायचे तर जा़ मी पण बघतो काय करायचे ते,’ अशी धमकी दिली

His wife looks like that actress did she come to walk today or not Defamation by sending mail to people in the society | त्याची बायको 'त्या' ॲक्ट्रेससारखी दिसते, आज आली की नाही चालायला? सोसायटीतील लोकांना मेल पाठवून बदनामी

त्याची बायको 'त्या' ॲक्ट्रेससारखी दिसते, आज आली की नाही चालायला? सोसायटीतील लोकांना मेल पाठवून बदनामी

पुणे: सोसायटीतील एका महिलेविषयी ‘त्याची बायको पॉर्न ॲक्ट्रेससारखी दिसते. ती आज आली की नाही चालायला?’ असा अश्लील ई-मेल सोसायटीतील सर्व सभासदांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका ४० वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शेखर बाबूलाल धोत्रे (रा. कडनगर, उंड्री, पिसोळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत फिर्यादी आणि आरोपी एकाच सोसायटीत राहतात. आरोपी धोत्रे याने ‘सोसायटीतील एकाची बायको पॉर्न ॲक्ट्रेससारखी दिसते. पॉर्न ॲक्ट्रेस आज आली की नाही चालायला?’ असे अश्लील बोलून सोसायटीमधील १४० सभासदांना मेल पाठवून फिर्यादीची बदनामी केली. हे समजल्यावर फिर्यादीचे पती जाब विचारण्यासाठी गेले असताना धोत्रे याने त्या महिलेच्या पतीस धक्काबुक्की करून ‘तुला पोलिसांत जायचे तर जा मी पण बघतो काय करायचे ते,’ अशी धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title: His wife looks like that actress did she come to walk today or not Defamation by sending mail to people in the society