शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पदवीधर, शिक्षकसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान; उद्या होणार मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 13:05 IST

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर,  सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात मतदान झाले.

ठळक मुद्देशिक्षक,  पदवीधरचा अंतिम निकाल लागण्यासाठी शुक्रवारची सायंकाळ उजाडणार मतमोजणीसाठी 1200 कर्मचारी व 700 पोलिसांचा बंदोबस्त  गुरूवारी सकाळी पुण्यातील बालेवाडी होणार मतमोजणीमतमोजणी शांततेत, सुरळीत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज टक्केवारी वाढल्याने प्रशासनासमोर मतमोजणीचे आवाहन 

पुणे : पुणे विभागात पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले आहे. या मतदार संघातील सर्व जिल्ह्यातील मतदान पेट्या पुण्यातील बालेवाडी गुरूवारी पहाटेपर्यंत पोहचतील. त्यानंतर बुधवार (दि.३) रोजी बालेवाडी येथे मतमोजणीला सुरुवात होईल. परंतु यावेळी  उमेदवारांची प्रचंड संख्या,त्यात झालेले भरघोस मतदान आणि मतमोजणीची किचकट प्रक्रिया यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी शुक्रवारची दुपार अथवा सायंकाळपर्यंत जाहीर होईल असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पुणे विभागात पदवीधरसाठी ५७. ९६ तर शिक्षकसाठी ७३.०४ टक्के मतदान झाले आहे. 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी विभागातील पुणे, सांगली, सोलापूर,  सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात मतदान झाले. गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी तब्बल १२०० कर्मचारी आणि ७०० पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यात पदवीधर मतदार संघासाठी ११२ टेबल व शिक्षकसाठी ४२ टेबल लावण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. दरम्यान मतमोजणी शांततेत, सुरळीत आणि नि:पक्षपातीपणे पार पाडण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज असल्याचे राव यांनी सांगितले. 
--------
अशी होते मतमोजणी 
पदवीधर व शिक्षक मतदार संघातील सर्व जिल्ह्याच्या मतपत्रिका एकत्र करणार. मतपत्रिकांची मोजणी करून स्वतंत्र ट्रेमध्ये ठेवणा. त्यानंतर वैध व अवैध म्हणजे बाद झालेले मतपत्रीका वेगळ्या काढण्यात येणार आहे. त्यानंतर एकूण वैध मतपत्रीका निश्चित झाल्यानंतर उमेदवार निवडून येण्यासाठीचा मतदानाचा कोट निश्चित केला जाईल. यात एकूण वैध मतदान व एकूण उमेदवारांवर हा कोटा निश्चित होईल. ( उदा: एकूण वैध मतदान 800 असेल तर भागिले 2 + निवडून द्यावयाची संख्या 1 : पहिल्या पसंती क्रमांकत निवडून येण्याचा मतांचा कोटा 401) असे निश्चित केले जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. यात पहिल्या पसंती फेरीत एकाद्या उमेदवाराला निश्चित केलेल्या कोट्या ऐवढे मतदन झाल्यास संबंधित उमेदवार निवडून आल्याचे जाहीर केले जाईल. तसे न झाल्यास दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजावी लागतील. असे झाल्यास मतमोजणीची प्रक्रिया लांबू शकते.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकVotingमतदानResult Dayपरिणाम दिवस