पीएमपीमधील कामगारांच्या वारसांना त्वरित कामाला घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:11 IST2021-01-21T04:11:26+5:302021-01-21T04:11:26+5:30

---- रिपब्लिकन जनतेतून ८ हजार ५०० उमेदवार विजयी पुणे : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन जनतेमधून ८ हजार ५०० उमेदवार ...

The heirs of the workers in the PMP should be hired immediately | पीएमपीमधील कामगारांच्या वारसांना त्वरित कामाला घ्यावे

पीएमपीमधील कामगारांच्या वारसांना त्वरित कामाला घ्यावे

----

रिपब्लिकन जनतेतून ८ हजार ५०० उमेदवार विजयी

पुणे : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन जनतेमधून ८ हजार ५०० उमेदवार निवडून आले आहेत. त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (यादव गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर यादव यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. विजयी उमेदवारांनी आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

----

महेश मते यांना श्रद्धांजली अर्पण

पुणे : पुणे जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीने अध्यक्ष महेश मते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. श्रद्धांजली कार्यक्रमात ज्युदो खेळाडूंच्या उपस्थितीत त्यांचे सुपुत्र रोहित मते यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले, सचिव दत्ता आफळे, रूपा गव्हाणे, खडकवासला सरपंच सौरभ मते, आदी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने महेश मते यांच्यावरील चित्रीफितीचे अनावरण देखील करण्यात आले. तसेच उपस्थितांच्या मनोगतातून दादोजी कोंडदेव, छत्रपती पुरस्कार विजेते संजय गव्हाणे, यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

Web Title: The heirs of the workers in the PMP should be hired immediately