शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

पुणे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर : मुठा पुन्हा वाहिली दुथडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 11:19 AM

नदीपात्रालगत असलेला भिडे पूल व दोन्ही पात्रांच्या बाजूचे रस्ते देखील पाण्याखाली गेले होते...

ठळक मुद्देखडकवासल्यातून ३१ हजार क्युसेक पाणी सोडले

पुणे : धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून तब्बल ३१ हजार ४४९ क्युसेक पाणी सोडले. त्यामुळे मुठा नदी पुन्हा दुथडी वाहिली. नदीपात्रालगत असलेला भिडे पूल व दोन्ही पात्रांच्या बाजूचे रस्ते देखील पाण्याखाली गेले होते. त्यामुळे शहरातील रस्ते वाहतूक काहीशी विस्कळीत झाली. वडीवळे धरण पाणलोटक्षेत्रात बुधवारी सकाळी आठपर्यंत ९६, आंद्रा ५८, पवना १०६, कासारसाई ४०, मुळशी ९९, टेमघर ८३, वरसगाव ७०, पानशेत ७१ व खडकवासला धरणक्षेत्रात १९ मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणी धरण पाणलोटक्षेत्रात ४७, नीरा देवघर ४४, भाटघर १६, वीर व उजनीला प्रत्येकी १ मिलिमीटर पाऊस झाला. बुधवारी दिवसभर देखील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाचपर्यंत वडीवळे ५३, पवना २५, मुळशी ३४, टेमघर, वरसगाव व पानशेतला प्रत्येकी ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, खडकवासला धरण क्षेत्रात १७ मिलिमीटर पाऊस झाला. बुधवारी रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे बुधवारी सकाळी नऊ वाजता टेमघर धरणातून ६०४, वरसगाव १० हजार ९५, पानशेत धरणातून ९,८३४ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे पुढे खडकवासला धरणातून २७,२०३ क्युसेकने पाणी सोडले. ...........सायंकाळी टेमघर धरणातील विसर्ग थांबविला. तर, वरसगाव धरणातून १२,४३५ व पानशेतमधून ५,५३२ क्सुसेक पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत होते. सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणातील विसर्ग ३१,४४९ क्युसेकपर्यंत वाढविला. ..........मुळशी धरणातूनही २० हजार क्युसेक पाणी सोडले होते. त्यामुळे बंडगार्डन येथून तब्बल ४८,७८३ क्युसेक पाणी उजनी धरणाकडे गेले. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. खडकवासला धरणातून ४ ते ८ आॅगस्ट दरम्यान साडेबावीस अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मुठा नदीत सोडले होते. .......गुंजवणी धरणातून २,५३०, नीरा देवघर ५,११०, भाटघरमधून ७,८२० क्युसेक पाणी सोडले. तर, वीर धरणातून पुढे ३२,५०९ क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले. ........ 

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीmula muthaमुळा मुठाRainपाऊस