शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सुविधाही होती तत्पर...

By admin | Updated: September 26, 2016 01:20 IST

मोर्चादरम्यान सहभागींना आरोग्याची कोणती समस्या जाणविल्यास त्यांना योग्य ती सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी संयोजकांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती

पुणे : मोर्चादरम्यान सहभागींना आरोग्याची कोणती समस्या जाणविल्यास त्यांना योग्य ती सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी संयोजकांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. लाखोंच्या संख्येने सर्व वयोगटातील लोक यामध्ये सहभागी झाल्याने आरोग्याची सुविधा असणे अत्यावश्यक होते. मोर्चाचा मार्ग हा जास्त लांबीचा होता, तसेच मार्गावर ऊनही असल्याने नागरिकांना काही शारीरिक त्रास उद्भवल्यास अडचण होऊ नये, यासाठी आरोग्याची अतिशय उत्तम सुविधा करण्यात आली होती. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी रुग्णवाहिका, तसेच डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते. मात्र कोणतीही आपतकालिन परिस्थिती उद्भवली नसल्याचे वैद्यकीय सेलच्या समन्वयक डॉ. मानसी जाधव यांनी सांगितले. अनेक वयस्कर व मध्यमवयीन लोक उन्हाचा त्रास होत असल्याने ग्लुकोजच्या मागणीसाठी अनेकांनी विचारणा केली आणि सहभागींना ग्लुकोज उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. यामध्ये २० रुग्णवाहिका, २ कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका, ५५० डॉक्टर, २०० नर्स, ५०० पॅरामेडिकल स्टाफ, २०० मदतनीस अशी व्यवस्था करण्यात आली होती. रुग्णवाहिका मोर्चाच्या मार्गावर एक चौक सोडून एक अशा प्रकारे ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय ससून शासकीय रुग्णालयात २ जणांना मोर्चादरम्यान दाखल करण्यात आले होते. हे दोघेही वयस्कर असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी सांगितले. यातील एक वृद्ध ७२ वर्षांचे होते त्यांना फीट आली होती, तर ५० वर्षांच्या पुरुषाला मोर्चादरम्यान चक्कर आल्याने ससूनमध्ये दाखल करण्यात आले. याशिवाय चक्कर येणे, डीहायड्रेशन यांसारख्या किरकोळ तक्रारींसाठीही १२ ते १५ जण रुग्णालयात आल्याचे डॉ. तावरे यांनी सांगितले.