त्यांनी दिले पाच जणांना जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 08:34 PM2020-02-20T20:34:15+5:302020-02-20T21:04:45+5:30

ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. या अवयवदानामुळे पाच रुग्णांना जीवनदान मिळाले.

He gave life to five people by donating his organs | त्यांनी दिले पाच जणांना जीवनदान

त्यांनी दिले पाच जणांना जीवनदान

googlenewsNext

पुणे : ते नेहमी म्हणायचे मी गेलाे तर माझं शरीर दान करा. नेहमी हसत असणारे, सामाजिक कामात अग्रेसर असणारे दामू गायकवाड (वय 52). नियतीने त्यांच्यासाेबत खेळ खेळला. आपल्या मावशीच्या तब्यतेची विचारपूस करण्यासाठी दाैंडला गेलेले दामू चक्कर येऊन रस्त्यात काेसळले आणि त्यांचा ब्रेनडेड झाला. समाजासाठी झटणाऱ्या आपल्या भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या भावाने त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला अन दामूंच्या रुपाने पाच जणांना नवसंजिवनी मिळाली. 

दामू गायकवाड हे पुण्यातील ताडीवाला राेड येथे राहत हाेते. तसा हा झाेपडपट्टीचा भाग. दामू यांचं शिक्षण केवळ चाैथी पर्यंतच झालेले असले तरी आपल्या वस्तीतील मुलांनी उच्च शिक्षण घ्यायला हवं अशी त्यांची इच्छा हाेती. त्यामुळे काेणीही शाळेत न जाता खेळताना दिसल्यास ते त्या मुलांना हटकायचे. समाजासाठी काहीतरी करत राहणे त्यांना आवडत हाेते. 10 फेब्रुवारीला त्यांच्या मावशीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दाैंडला गेलेले असताना रस्त्यात त्यांना चक्कर येऊन ते काेसळले. त्यांच्या डाेक्याला मार लागल्याने त्यांचा ब्रेनडेड झाला. त्यांना पुण्यातील रुबी हाॅल क्लिनिक हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सात दिवस त्यांच्यावरील उपचारानंतरही त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. डाॅक्टरांनी बंडू गायकवाड यांना दामू यांचे अवयवदान करण्याचा सल्ला दिला. आपल्या भावाचे प्राण जाणार या दुःखात असलेल्या बंडू गायकवाड यांनी आपल्या भावाच्या अवयवांच्या माध्यमातून इतरांना जीवनदान मिळेल या विचारातून त्यांनी मनावर दगड ठेवून भावाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. 

दामू यांचे ह्रद्य दिल्लीतील एका महिला रुग्णाला देण्यात आले तर फुफुसे आणि लिव्हर मुंबईतील ग्लाेबल हाॅस्पिटलमधील रुग्णांना देण्यात आले. एक किडनी पुण्यातील ससून रुग्णालयातील रुग्णाला तर एक रुबी हाॅलमधीलच एका रुग्णाला देण्यात आली. अशाप्रकारे दामू यांच्या माध्यमातून देशातील विविध भागातील गरजू रुग्णांना अवयवरुपी जीवनदान देण्यात आले. दामू यांच्या सामाजिक कार्याला आणि त्यांचे बंधू बंडू यांच्या अवयवदान करण्याच्या निर्णयाला सर्वांनीच सॅल्यूट केला. ताडीवाला राेड वसाहतीमध्ये सर्वत्र त्यांच्या कार्याचे काैतुक केले जात असून अनेकांना यातून प्रेरणा मिळाली आहे. 

बंडू गायकवाड म्हणाले, दामू यांचे अवयवदान करण्याचा निर्णयाचे सर्वचजण काैतुक करत आहेत. तुम्ही माेठा आणि अभिमानस्पद निर्णय घेतल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. माझा भाऊ जरी या जगातून गेला असला तरी पाच जणांमध्ये ताे आजही जीवंत आहे. 

Web Title: He gave life to five people by donating his organs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.