शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस निरीक्षकासह हवालदार गजाआड

By admin | Updated: September 8, 2014 04:12 IST

अवघ्या दहा दिवसांपूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक प्रताप अशोक भोसले यांचा ‘प्रताप’ उघडकीस आला आहे

वडगाव निंबाळकर : अवघ्या दहा दिवसांपूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक प्रताप अशोक भोसले यांचा ‘प्रताप’ उघडकीस आला आहे. भोसले यांच्यासह पोलीस हवालदार मुश्ताक शेख यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.येथील पोलीस ठाण्यात अवघ्या दहा दिवसांपूर्वी भोसले हे रुजू झाले होते. पणदरे (ता. बारामती) येथील खुनी हल्ला प्रकरणी ४ आरोपी अटकेत आहेत. त्यांना जामीन मिळण्यासंदर्भात,जामीन अर्जावर सरकारतर्फे मदत, असे उत्तर देण्यासाठी आरोपींच्या नातेवाइकांकडे भोसले व शेख यांनी ६० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे नातेवाइकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत तांदळे,चंद्रकांत ठाकूर,पोलीस हवालदार दशरथ चिंचकर, दीपक टिळेकर, महेश झगडे, विजय माळी यांच्या पथकाने शनिवारी (दि. ६) रात्री १०.३०च्या सुमारास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सापळा रचला. यवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार सुरेश रोकडे यांच्या मध्यस्थीने तक्रारदाराकडील ६० हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस हवालदार शेख यांना रंगेहाथ पकडले. प्रताप भोसले यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याचे हवालदार शेख यांनी सांगितले.पदाचा दुरुपयोग करून लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.