शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरून इच्छुकांच्या शुभेच्छा

By admin | Updated: September 1, 2016 01:21 IST

सहा महिन्यांवर महापालिका निवडणूक आली असल्याने इच्छुकांनी प्रचारयंत्रणा कार्यान्वित केली आहे.

पिंपरी : अवघ्या सहा महिन्यांवर महापालिका निवडणूक आली असल्याने इच्छुकांनी प्रचारयंत्रणा कार्यान्वित केली आहे. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक या सोशल मीडियाचा वापर त्यांच्याकडून अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. खासगी एजन्सी नेमून वॉर्डातील मतदारांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. वाढदिवस, सण, उत्सव या निमित्ताने वारंवार व्हॉट्स अ‍ॅपवर शुभेच्छा संदेशांचा मारा केला जात आहे. जेमतेम शिक्षण झालेले नगरसेवक, इच्छुक उमेदवारही आता स्मार्ट फोनचा वापर करू लागले आहेत. वॉर्डात होणाऱ्या कार्यक्रमांची, उपक्रमांची माहिती व्हॉट्स अ‍ॅप, तसेच फेसबुकवर अपलोड करण्याची खास यंत्रणा त्यांनी राबवली आहे. केवळ हेच काम करण्यासाठी काही कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. इच्छुकांनी स्वत:ची निवडक छायाचित्रे मोबाइलवरील माहिती अपडेट करणाऱ्यांकडे दिली आहेत. दरमहा विशिष्ट रक्कम अदा केली जात असल्याने सोशल मीडियावर सातत्याने त्यांचे अपडेट्स पाहावयास मिळू लागले आहेत. नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयात जुन्या मतदार याद्या चाळण्याचे, मतदारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते यांचे वाढदिवस आता धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. दर वर्षी दहीहंडी, गणेशोत्सवासाठी वर्गणी मागण्यास येणाऱ्या कार्यकर्त्यांशी इच्छुक उमेदवार यंदा स्वत:च संपर्क साधू लागले आहेत. किती वर्गणीची अपेक्षा आहे, अशी त्यांना विचारणा होऊ लागली आहे. पावती पुस्तक घेऊन वर्गणीसाठी नगरसेवकांच्या कार्यालयात खेटे माण्याची वेळ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर येणार नाही. नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारच त्यांच्या भेटीला जाऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)