शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Updated: July 5, 2015 00:25 IST

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर सासवड येथे सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर कारवाई करीत अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्या पाडण्यात आल्या. दरम्यान, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे

सासवड : पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर सासवड येथे सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर कारवाई करीत अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्या पाडण्यात आल्या. दरम्यान, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मेहुण्याच्या श्रीनाथ बियर शॉपीसमोरील पत्र्याचे शेड काढण्यास टाळाटाळ केल्याने राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी रस्ते बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर केला. अधिकाऱ्यांनीही हे शेड काढण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास घालविले. त्यामुळे कारवाई करायची असेल तर सलग करा अन्यथा कारवाई करू देणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतल्यानंतर मीटर पट्टीने अंतर मोजून अखेर बांधकाम पाडण्यात आले. त्यानंतर पुढील अतिक्रमण काढले . या मोठ्या कारवाईबद्दल सर्वसामान्य नागरिक, स्थानिक रहिवासी, वाहनचालक यांनी स्वागत केले आहे. तसेच एकदा रस्ता मोकळा केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, बांधकामे होणार नाहीत याची रस्ते बांधकाम विभागाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. या बरोबरच सोमवारी जेजुरी, त्यानंतर वाल्हे, नीरा येथे मोठी कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढावीत. अन्यथा एकदा कारवाई सुरु केल्यास पुन्हा थांबविण्यात येणार नाही. या कारवाईमध्ये सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता विजयकुमार ठुबे यांच्याबरोबर उपभियांता डी. के. इंगळे, ज्ञानेश्वर हुंडेकरी, रमेशकुमार ताठे, पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक सुरेससिंग गौड, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे, नारायण गिते, ए. एस. टापरे, राजगडचे पोलीस उपनिरीक्षक शेवते, सहायक फौजदार, पोलीस हवालदार असे एकूण ३५ कमर्चारी, त्याचप्रमाणे सासवडचे मंडल अधिकारी मनीषा भूतकर, तलाठी डी. एम. देवकर, हमीद शेख आदी उपस्थित होते. (वार्ताहर)आम्ही कोणाच्याही दबावाखाली काम करीत नाही अथवा कोणाला पाठीशीही घालण्याचा प्रश्न येत नाही. वास्तविक पाहता रस्ता मोकळा होणे ही सर्वांसाठी महत्त्वाची बाब आहे. बांधकामे पडताना कोणी विनंती केल्यास नुकसान होऊ नये म्हणून काही काळ सवलत दिली जात आहे. त्यातूनही त्याने अतिक्रमण स्वत:हून न काढल्यास थेट कारवाई करण्यात येत आहे. तसेच सासवडमधील संपूर्ण कारवाईमध्ये कुठेही राजकीय हस्तक्षेप झाला नाही. तसेच कारवाई करताना कोणीही राजकीय व्यक्तींनी तसे सांगितलेदेखील नाही. - विजयकुमार ठुबे, विभागीय अभियंता, सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग