नायगाव येथे गुरुपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST2021-07-24T04:09:09+5:302021-07-24T04:09:09+5:30

श्री सिध्देश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापूजा सकाळी पुजारी सचिन जगताप यांच्या हस्ते झाली. सकाळी साडेआकरा वाजता ...

Gurupournima celebration at Naigaon | नायगाव येथे गुरुपौर्णिमा साजरी

नायगाव येथे गुरुपौर्णिमा साजरी

श्री सिध्देश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापूजा सकाळी पुजारी सचिन जगताप यांच्या हस्ते झाली. सकाळी साडेआकरा वाजता सिध्देश्वर व माता जोगेश्वरी यांची महाआरती झाली. कोरोनाच्या सावटामुळे सर्व प्रकारची काळजी घेऊन पौर्णिमा साजरी करण्यात आली. कोरोना रोगामुळे सर्वच मंदिरे बंद असल्याने आज भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही. दिवसभरातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सिध्देश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव राहुल कड यांनी दिली.

कोरोनाचे संकट लवकर जावे, अशी ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने श्री सिध्देश्वर व माता जोगेश्वरी यांना प्रार्थना करण्यात आली.

--

फोटो क्रमांक: २३ भुलेश्वर गुरुपौर्णिमा

फोटो ओळ - श्रीक्षेत्र भुलेश्वर नायगाव येथील श्री सिद्धेश्वर व माता जोगेश्वरी यांची केलेली आकर्षक सजावट.

Web Title: Gurupournima celebration at Naigaon