महात्मा गांधी विद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:19 IST2021-03-13T04:19:34+5:302021-03-13T04:19:34+5:30

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक साहेबराव ...

Greetings to Yashwantrao Chavan at Mahatma Gandhi Vidyalaya | महात्मा गांधी विद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

महात्मा गांधी विद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक साहेबराव काळे, ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख लक्ष्मण रोडे, केशव टेमकर ,किशोर जगताप, दिलीप चौधरी, अश्रफ खान पठाण, संतोष मुंडे, निवृत्ती बांगर, दत्तात्रेय खोरे,एकनाथ चव्हाण, नितीन शिरोळे, सचिन आढळराव, संजय बाणखेले, सुवर्णा गोसावी, उज्ज्वला हुले, मनीषा थोरवे, वैशाली सुरकुले, प्रतिभा दीक्षित, दुर्गा चौधरी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे संरक्षण मंत्री व भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. उत्कृष्ट संसदपटू,उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्याचबरोबर ते रसिक व साहित्यिक होते, असे मत विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांच्या कार्याची व त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. विजय शेळकंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Greetings to Yashwantrao Chavan at Mahatma Gandhi Vidyalaya